supreme court 
देश

घटस्फोटासाठी एक कायदा झाल्यास 'मुस्लिम पर्सनल लॉ'वर परिणाम; सुप्रीम कोर्टाची सावध भूमिका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सर्व धर्मांमध्ये घटस्फोट आणि पोटगीसाठी एक समान कायदा लागू करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. या अंतर्गत न्यायालयाने केंद्राला नोटिस पाठवली आहे. त्यात म्हटलं आहे की, अशा प्रकारच्या मागणीमुळे मुस्लिम पर्सनल लॉ वर परिणाम होऊ शकतो.

भाजप नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. यात म्हटलं आहे की, सर्व धर्मांच्या महिलांसोबत सारखाच व्यवहार झाला पाहिजे. जर काही धार्मिक प्रथांमुळे त्यांच्या मौलिक अधिकारांवर गदा येत असेल तर अशा प्रथा परंपरा बंद केल्या पाहिजेत.

न्यायालयाने म्हटलं की, आम्हाला यामध्ये सावध राहून विचार करावा लागेल. तुम्ही अशा दिशेने नेत आहात ज्यामुळे पर्सनल लॉ धोक्यात येऊ शकतो. असं झाल्यास ज्या उद्देशाने पर्सनल लॉ केला आहे तोच नाहीसा होईल अशी भीतीही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.

सुनावणीवेळी पिंकी आनंद आणि मीनाक्षी अरोरा यांनी बाजू मांडली. त्यात म्हटलं की, तलाक आणि पोटगीच्या प्रकरणात वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या तरतुदी आहेत. हे भेदभाव नष्ट करायला हवेत. यावर पीठाने विचारलं की, आपण याला पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप न करता हे करू शकतो का? यावर वकीलांनी शायरा बानोच्या निर्णयाचा दाखला दिला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाक हा असंवैधानिक असल्याचा निकाल दिला होता. 

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर याची सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की, आम्ही सावधानतेची नोटीस जारी करत आहे. कारण या प्रकारची मागणी पर्सनल लॉवर परिणाम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT