Supreme Court of India Team esakal
देश

SC वकीलांना म्हणाले, ऑर्डर ऑर्डर... ऑनलाईन सुनावणीवेळी मोबाईल बंद ठेवा!

ऑनलाईन सुनावणी दरम्यान येणाऱ्या अडचणीमुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

सुधीर काकडे

भारताचे सरन्यायाधीश (CJI) एन.व्ही. रमणा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी डिजिटल सुनावणीदरम्यान अनेक वकिलांकडून मोबाईल फोनचा वापर केल्याचं निरीक्षण नोंदवले. सुनावणी दरम्यान, वारंवार होणाऱ्या मोबाईच्या वापरावर नाराजी व्यक्त केली. यावेळी न्यायालयाने सांगितलं की, यामुळे सुनावणी दरम्यान मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर बंदी घालावी लागेल.

सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ति ए.एस बोपन्ना आणि न्यायमूर्ति हिमा कोहली यांच्या पीठाने या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली होती. ऑनलाईन सुनावणी दरम्यान, व्हिडिओ आणि ऑडिओमध्ये आलेल्या अडचणींमुळे १० प्रकरणांची सुनावणी स्थगित करावी लागली. एका प्रकरणावर सुनावणी करत असताना पीठाने सांगितलं की, वकील मोबाईल वापरताना दिसत आहेत, ज्यामुळे ते दिसत नाहीत. आम्हाला मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालावे लागू शकतात. पुढे सर्व वकीलांना उद्देशून न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की, तुम्ही सर्व सर्वोच्च न्यायालयात वकीली करत आहात आणि नेहमी सुनावणीसाठी उपस्थित राहत आहात. कंप्यूटर वापरू शकत नाही का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT