supreme court esakal
देश

Supreme Court : निवडणुकीला उभं राहू दिलं नाही, आता राष्ट्रपती बनवा; पठ्ठ्याची थेट न्यायालयात धाव

२००४ पासूनचं वेतनही आपल्याला मिळावं, अशी मागणी या व्यक्तीने केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला राष्ट्रपती म्हणून घोषित करा, अशी मागणी करण्यासाठी एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. त्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर विचारही केला जाणार नाही, असं खंडपीठाने म्हटलं आहे.

न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाकडे ही याचिका गेली होती. या याचिकेला कोर्टाने महत्त्व नसलेली आणि न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करणारी आहे, असं म्हटलं आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितलं होतं की, त्याला भारताच्या राष्ट्रपती पदासाठी बिनविरोध उमेदवार बनवण्याचे निर्देश द्यायला हवे आणि त्याला २००४ पासूनचं वेतन आणि भत्ते द्यायला हवेत. कारण त्यावेळी त्याला नामांकन भरण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती.

गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करत असलेल्या किशोर जगन्नाथ सावंत यांनी ही याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी आपल्याला राष्ट्रपती निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली आणि सरकारच्या धोरणांशी लढण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, असं सांगितलं. यामध्ये त्यांनी तीन मुद्दे मांडले होते - पहिला मुद्दा म्हणजे २०२२ मध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना बिनविरोध उमेदवाराच्या रुपात स्विकारले जाण्याचे निर्देश देण्यात यावेत. दुसरा मुद्दा म्हणजे भारताचा राष्ट्रपती म्हणून त्यांच्या नियुक्तीचे निर्देश द्यावेत आणि तिसरं म्हणजे २००४ च्या आधी राष्ट्रपतींना देण्यात येणारं वेतनही देण्यात यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल

Latest Marathi News Live Update : नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

Video: भिंत पाडण्यासाठी आमदार स्वतः चढले जेसीबीवर; दिलीप लांडेंचा व्हिडीओ व्हायरल

Kalamnuri Nagar Parishad Election : मतांसाठी आता लक्ष जातीवर; उमेदवारांकडून अखेरचे डावपेच, प्रचारासाठी तीनच दिवस

Honour Killing : प्रेयसीनं घरी बोलावलं अन् तिच्या कुटुंबीयांनी प्रियकराचे हात-पाय बांधून गोळ्या झाडून केली निर्दयीपणे हत्या

SCROLL FOR NEXT