Mukesh Ambani 
देश

मुकेश अंबानींसह कुटुंबीयांना VIP सुरक्षा कायम राहणार; SC ची केंद्र सरकारला संमती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली :उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कायम राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईत सुरक्षा कवच देणे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याविरोधात त्रिपुरा उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणीही न्यायालयाने रद्द केली आहे. (Supreme Court on Ambani family Security news in maarathi)

सीजेआय खंडपीठाने, मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने दिलेली सुरक्षा कायम ठेवण्याचे आदेश देताना, त्यांच्या सुरक्षेविरोधात त्रिपुरा उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी सुरू ठेवण्याचे काहीही कारण नसल्याचं म्हटलं. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईत मिळत असलेल्या सुरक्षेविरोधात आव्हान देणारी जनहित याचिका त्रिपुरा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला गृह मंत्रालयाकडे ठेवण्यात आलेली मूळ फाइल सादर करण्याचे निर्देश दिले होते, ज्याच्या आधारावर अंबानी कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने उच्च न्यायालयातील याचिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की, उद्योगपती आणि कुटुंबाला पुरवण्यात आलेल्या सुरक्षेचा त्रिपुरा सरकारशी काहीही संबंध नाही आणि उच्च न्यायालयाला जनहित याचिका स्वीकारण्याचा अधिकार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT