Supreme Court on Chandigarh Mayor Poll Case AAP Vs BJP votes at poll will be recounted 8 aap votes treated as valid  
देश

Chandigarh Mayor Poll Case : भाजप तोंडघशी! सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं चंदीगडच्या महापौर निवडणुकीचा बदलणार निकाल

Supreme Court on Chandigarh Mayor Poll Case : चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

रोहित कणसे

Supreme Court on Chandigarh Mayor Poll Case : चंदीगड महापौर निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मतपत्रिकेची तपासणी केल्यानंतर सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने अवैध ठरविण्यात आलेली ८ मते आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांच्या बाजूने असल्याचे सांगितले.

आता या निवडणुकीबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. न्यायालयाने सर्व ८ अवैध मते वैध ठरवली आहेत. त्यानंतर आता पुन्हा मतमोजणी होणार आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातील ८ मते अवेध ठवल्याच्या वादावर सुनावणी झाली. यानंतर या मतांची पुन्हा मोजणी केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. या आधारेच निकाल जाहीर केला जाणार आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे चंदीगडमध्ये आम आदमी पक्षाचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत या मतांची पुनर्मोजणी झाल्यानंतर महापौरपदाच्या शर्यतीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट विजय मिळणार आहे. ही सर्व मते कोणतेही ठोस कारण न देता फेटाळण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी या प्रकरणी सुनावणी झाली. सरन्यायाधीशांनी वकील आणि निरीक्षकांना मतपत्रिका दाखवल्या आणि अवैध ठरविण्यात आलेल्या ८ मतपत्रिकांपैकी सर्व मतपत्रिकांव कुलदीप कुमार यांच्या नानावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. अनिल मसीह यांनी या मतपत्रिकेवर एक रेषा ओढली होती, असे न्यायालयाने नमूद केले.

कोणताही गैरप्रकार नसताना आपण त्यांना बेकायदेशीर ठरवणारी रेषा का ओढली, असा सवालही न्यायालयाने केला. यावर अनिल मसीह यांच्या वकिलांनी मतदानादरम्यान वातावरण खराब झाल्याचे सांगितले. त्यामुळे कदाचित हे लोक मतपत्रिकेत गडबड करून त्या घेऊन पळून जात असावेत, असे अनिल मसीह यांना वाटले असे सांगण्यात आले.

त्यामुळे अनिल मसीह याने मतपत्रिका हिसकावून त्यावर क्रॉस मार्क करून त्या अवैध ठरवल्या. मात्र, त्यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाचे समाधान झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT