supreme court supreme court
देश

मुकेश अंबानींना सुप्रीम कोर्टाचा झटका; Amazon चा मोठा विजय

सुरज यादव

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल आणि किशोर बियानी यांचा फ्युचर ग्रुपमध्ये 24 हजार 713 कोटींचा करार झाला होता. आता या प्रकरणी मुकेश अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. या करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

नवी दिल्ली - मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल आणि किशोर बियानी यांचा फ्युचर ग्रुपमध्ये 24 हजार 713 कोटींचा करार झाला होता. आता या प्रकरणी मुकेश अंबानी यांना मोठा धक्का बसला आहे. या करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायलयाने सांगितलं की, या प्रकरणी Emergency Arbitrator चा निर्णय लागू करणं योग्य आहे. इमर्जन्सी आर्बिट्रेटरने फ्युचर रिटेलच्या करार स्थगित करण्याचा आदेश दिला होता.

सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटलं की, फ्युचर रिटेलसोबत रिलायन्सचा करार स्थगित करण्याचा आदेश ऑर्बिट्रेटरने दिला होता. तो लागू करण्यायोग्य आहे. फ्यूचर रिटेलने त्यांचा पूर्ण बिझनेस रिलायन्स रिटेलला विकला होता. अमेझॉनने रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपच्या करारासंदर्भात वेगवेगळ्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. सिंगापूर इंटरनॅशनल ऑर्बिट्रेटर सेंटरला इमर्जन्सी ऑर्बिट्रेटर म्हटलं जातं. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमधील डीलविरोधात अमेझॉनने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.

भारतीय अँटिट्रस्ट रेग्युलेटरने अमेरिकेच्या कंपनीवर लावला आरोप

सर्वोच्च न्यायालयाने यावर आज सुनावणी केली. न्यायमूर्ती आर एफ नरीमन यांच्या पीठाने सर्व पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर निर्णय घेतला. भारताच्या अँटिट्रस्ट रेग्युलेटरने अमेरिकी कंपनीवर आरोप लावला होता की जेव्हा कंपनीने फ्यूचर ग्रुपमध्ये गुंतवणुकीची मंजुरी मागितली होती, त्यावेळी कंपनीने तथ्य लपवले होते. तसेच खोटी माहिती देण्यात आली होती. न्यायालयाने बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT