Supreme_Court_ 
देश

राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी चांगले गुण मिळवल्यास, त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश- सुप्रीम कोर्ट

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटलंय की, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांइतके गुण मिळवले असल्यास त्यांचा प्रवेश जनरल श्रेणीअंतर्गत दिला जावा, तर राखीव प्रवर्ग मागास वर्गातील त्या उमेदवारांसाठी असेल, ज्यांनी त्या कॅटेगरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक गुण मिळवले आहेत. कोर्टाने हा निर्णय स्टेट ऑफ तमिळनाडू विरुद्ध शोभना प्रकरणात दिला आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल, दिनेश माहेश्वरी आणि ऋषिकेश रॉय यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. येथे तमिळनाडू गव्हर्नमेंट सर्वेंट (कंडीशन ऑफ सर्व्हिस) अॅक्ट, 2016 च्या कमल 27(एफ) संबंधित याचिकेवर सुनावणी होत होती. या प्रकरणात याचिकाकर्त्याने पोस्ट ग्रॅज्युएट असिस्टेंट आणि फिजिकल एज्युकेशन डायरेक्टर्स, ग्रेड-1 च्या पद भरतीसाठी अर्ज केला होता.   

याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, मोस्ट बॅकवर्ड क्लास (MBC) कोटामधून काही उमेदवारांना निवडण्यात आले. या उमेदवारांना जनरल वॅकेंसी अंतर्गत ठेवण्यात आले नाही, पण एमबीसी कोटामधून निवडण्यात आले. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, त्यांची निवड होऊ शकली नाही कारण त्या उमेदवारांनी निवड जनरल कॅटेरगीतून न करता MBC/DNC कोट्यातून करण्यात आली. या उमेदवारांना जनरल श्रेणीमध्ये ठेवले जाणार होते आणि त्यानंतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना बॅकलॉगच्या रिक्त जागांमध्ये स्थान दिले जाणार होते. त्यानंतर वर्तमान रिक्त जागा भरल्या जाणार होत्या. 

काय सांगते कलम 27

कलम 27 (एफ) मध्ये सांगण्यात आलंय की, राखीव जागा एका विशेष वर्षात भरल्या गेल्या नाहीत तर त्या सामान्य क्षेणीत ठेवण्याऐवजी त्या जागा एक वर्षासाठी पुढे ढकलल्या जातील. त्यानंतर बॅकलॉगच्या रिक्त जागा आधी भरल्या जातील आणि त्यानंतर सामान्य रोटेशनचे पालन केले जाईल. 

तमिळनाडू सरकारने म्हटलं होतं की, कलम 27 चे योग्यतेच्या आधारवर निवडीसोबत काही देणं-घेणं नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, कलम 27 मध्ये सांगण्यात आलंय की, जर आरक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या समुदायातील उमेदवारांची पुरेशी संख्या उपलब्ध नसल्यास, अशा जागांना बॅकलॉग म्हटलं जाईल आणि त्या पुढील वर्षी भरल्या जातील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT