Supreme Court  sakal
देश

वन्नियार समाजाचे 10.5 टक्के आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

राखीव श्रेणीमध्ये कोटा मंजूर करण्यासाठी केवळ जात हा एकमेव आधार असू शकत नाही, असेदेखील न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वन्नियार आरक्षण (Vanniyar Reservation) कायदा 2021 घटनाबाह्य ठरवला असून, तामिळनाडूतील (Tamil Nadu) वन्नियार समाजाला दिलेले 10.50 टक्के आरक्षण रद्द केले आहे. राखीव श्रेणीमध्ये कोटा मंजूर करण्यासाठी केवळ जात हा एकमेव आधार असू शकत नाही, असेदेखील न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब करत वन्नियार आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिले. हे आरक्षण मद्रास (Madras High Court) उच्च न्यायालयाने रद्द केले. (Supreme Court On Tamil Nadu Vanniyar Community Reservation)

वन्नियार ही तामिळनाडूची सर्वात मागासवर्गीय समाज (MBC) आहे. राज्य सरकारने या समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10.50 टक्के आरक्षण दिले आहे. तामिळनाडू विधानसभेने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तत्कालीन सत्ताधारी AIADMK सरकारने मांडलेले विधेयक मंजूर केले होते. यामध्ये वन्नियार समाजासाठी 10.5% अंतर्गत आरक्षण देण्यात आले. यानंतर, द्रमुक सरकारने जुलै 2021 मध्ये त्याच्या अंमलबजावणीसाठी आदेश जारी केला होता.

राज्य सरकारने MBC आणि गैर-अधिसूचित समुदायांसाठी एकूण 20 टक्के आरक्षण समाजाच्या तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले होते. या अंतर्गत वन्नियार समाजासाठी 10 टक्क्यांहून अधिक उप-कोटा निश्चित करण्यात आला होता. पूर्वी वन्नियार वन्नियाकुल क्षत्रिय म्हणून ओळखले जात असे. तामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण आहे, ज्यामध्ये मागास समाजासाठी 30 टक्के, अतिमागास समाजासाठी 20 टक्के, अनुसूचित समाजासाठी 18 टक्के आणि अनुसूचित जमातींसाठी 1 टक्के आरक्षण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT