Supriya Sule sakal
देश

सातव्यांदा संसदरत्न ठरल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या; 'संसदेतील स्टाफ...'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्राईम पॉईंट फाऊंडेशनने 11 खासदारांना 'संसद रत्न अवार्ड 2022'ने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. त्या आता सातव्यांदा संसद रत्न पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या 11 खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चार खासदार आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यामध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित यांचाही समावेश आहे. हा 12 वासंसद रत्न पुरस्कार सोहळा २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार सलग सातव्यांदा घोषित झाला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना केलेल्या संसदीय कार्याची दखल घेतली गेली, याचे समाधान आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, हा सन्मान आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला संसदेत बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वजण तसेच संसदेतील सहकारी, संसदेतील स्टाफ, माझे सर्व सहकारी यांची सातत्याने बहुमोल अशी साथ कायम मिळत आहे. याबद्दल मी सर्वांची शतशः ॠणी आहे. आपला हा विश्वास,हे प्रेम मला आपल्यासाठी काम करण्याची ऊर्जा देते. हा स्नेहबंध आणखी दृढ व्हावा ही प्रार्थना, असंही त्या म्हणाल्या आहेत.

कोण आहेत संसद रत्न?

तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) यांना या 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल संसदरत्न पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

"मी दुनियादारी 2 करणार नाही" अखेर संजय जाधव स्पष्टच बोलले; "कदाचित सुहास शिरवळकर.."

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

SCROLL FOR NEXT