Supriya Sule On PM Modi Parliament Speech e sakal
देश

प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नहीं, हैरान हूँ मैं : सुप्रिया सुळे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसने मजुरांना तिकीट काढून देऊन महाराष्ट्रातून बिहार-उत्तर प्रदेशमध्ये कोरोना पसरवण्याचं काम केलं, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. त्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत मोदींना काही सवाल विचारले आहेत. तसेच तुमसे नाराज नहीं, हैरान हूँ मैं, असंही त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाल्या.

लॉकडाऊन काळात मला एक फोटो कोणीतरी पाठवला होता. त्यांच्या हातात एक बॅग होती. त्यावर मुलगा झोपला होता. त्यावर लिहिलं होतं, ''तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं''. मला आज नरेंद्र मोदींना एकच प्रश्न विचारायचा आहे, ''प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नहीं, हैरान हूँ मैं'' असं सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींना म्हणाल्या. (Supriya Sule Replied PM Modi Parliament Speech)

मोदींनी केलेल्या वक्तव्याला काही शास्त्रीय पुरावे नाहीत. महाराष्ट्रातील लोकांबद्दल आम्ही सुपरस्प्रेडर आहोत असं कोणी बोललं तर ते आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला मी सर्व पुरावे देऊन इथं बोलत आहे. महाराष्ट्रातील लेक म्हणून मी तुमच्याकडे न्याय मागतेय. तुम्ही महाराष्ट्राबाबत असं का बोलले? त्यांना महाराष्ट्राबाबत का द्वेष वाटतो? याचं उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावं. मुंबईचं महत्व कमी करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. हे त्यांना का महत्वाचं वाटतं? असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मोदी नेमकं काय म्हणाले होते? -

पंतप्रधान मोदींनी देशात कोरोना पसरवण्याचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. त्यांनी टीका करताना त्यांनी म्हटलंय की, पहिल्या लाटेत काँग्रेसने हद्द केली. देश लॉकडाऊनचे पालन करत होता. जागतिक आरोग्य संघटना सगळ्यांना सल्ले देत होती. जे जिथे आहेत, त्यांनी तिथेंच थांबावं, असा संदेश दिला जात होता. तेंव्हा काँग्रेसवाल्यांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर श्रमिकांना मोफत तिकीट दिलं. महाराष्ट्रातील आपलं ओझं कमी व्हावं यासाठी लोकांना प्रेरीत केलं की, जा तुम्ही यूपी, बिहारचे आहात तिकडे जा असं म्हटलं. त्यामुळे कोरोना पसरला, असं मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT