Babul Supriyo 
देश

अंतर्गत राजकारणालाच सुप्रियो कंटाळले; बंगालच्या प्रदेशाध्यक्षांवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातून नुकतीच गच्छंती झालेले पश्चिम बंगालचे भाजप खासदार बाबूल सुप्रियो यांच्या राजकारण संन्यासाच्या घोषणेमागे राज्य भाजपमधील अंतर्गत राजकारण व साठमारी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुप्रियो यांनी आणखी एक फेसबुक पोस्ट लिहून त्यांच्या निर्णयावर टीका करणारे भाजपचे पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर सडकून निशाणा साधला. यापुढे आपण पार्श्वगायन व गाण्याचे कार्यक्रम यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही सुप्रियो यांनी सांगितले आहे. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याबरोबर चांदणी चित्रपटासाठी गायलेल्या गाण्यामुळे सुप्रियो यांना बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळाली.

सुप्रियो यांच्या राजकारण सोडण्याच्या निर्णयावर खासदार घोष यांनी टीका केली होती तर तृणमूलचे खासदार कुणाल घोष यांनी सुप्रियो हे नाटकबाजी करत असल्याचे म्हटले होते. या दोघांच्याही ट्विटचे स्क्रिनशॉटही सुप्रियो यांनी बंगालीतील फेसबुक पोस्टला जोडले आहेत. त्यांनी म्हटले आहे, की राजकारण सोडल्यावर आपल्याला या भाषेतील टीकेला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे आपली सकारात्मक ऊर्जा वाचेल व गाण्याच्या क्षेत्रात आपण चांगले काम करू शकू. या दोघांनीही माझ्या निर्णयावर जी टिप्पणी केली त्यात त्यांनी त्यांच्या परीने भाषेचा वापर केला आहे. मी या टीकेला माझ्या कामातून उत्तर देईन. चांगले काम करण्यासाठी खासदार किंवा मंत्रीच व्हावे लागते काय .दिलीप घोष यांनी म्हटले होते, की फेसबुक पोस्ट लिहून राजकारण सोडले जात नाही हे सुप्रियो यांना कोणीतरी समजवावे. कुणाल घोष यांनी म्हटले होते की संसद (लोकसभा) चालू आहे. तिकडे सभापती बसले आहेत. त्यांच्याकडे राजीनामा देण्याऐवजी फेसबुकवरच नाटकबाजी सुरू आहे. आधी ते गाणे गात, आता नाटक करत आहेत. खरे तर त्यांना राजकारण सोडायचे नाही. केवळ ‘शोले’ चित्रपटात टाकीवर चढलेल्या धर्मेंद्रप्रमाणे लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधायचे आहे. या टीकेमुळे सुप्रियो आणखी व्यथित झाल्याचे दिसते.

मन वळविण्याचे दिल्लीतून प्रयत्न

भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रियो बंगालमध्ये विशेषतः भद्र समाजात बऱ्यापैकी लोकप्रिय असल्याने त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न दिल्लीतून सुरू आहेत. गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा या दोघांशीही सुप्रियो यांनी चांगले संबंध ठेवल्याने त्यांचे मन वळविण्यात भाजप नेतृत्वाला यश येईल, असाही मतप्रवाह भाजपमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT