Chhattisgarh-SDM file photo
देश

उप-जिल्हाधिकाऱ्याची दादागिरी, कानाखाली लगावलेला VIDEO VIRAL

उपजिल्हाधिकारी राजपूत हे जिल्हाधिकाऱ्यांच्या एक पाऊल पुढेच निघाले. तरुणाला कानशिलात लगावल्यानंतर त्यांनी त्याला उठा-बशा काढण्याची शिक्षा सुनावली.

वृत्तसंस्था

उपजिल्हाधिकारी राजपूत हे जिल्हाधिकाऱ्यांच्या एक पाऊल पुढेच निघाले. तरुणाला कानशिलात लगावल्यानंतर त्यांनी त्याला उठा-बशा काढण्याची शिक्षा सुनावली.

रायपूर : छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका तरुणाला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्याच जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओही व्हायरल होऊ लागला आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ आता उपजिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांचाच कित्ता गिरवल्याने हा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे. ()

सूरजपूरचे उपजिल्हाधिकारी प्रकाश सिंह राजपूत यांनीही रस्त्याने जाणाऱ्या एका युवकाला कानशिलात लगावली. लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले होते. काही नागरिक रस्त्याने जाताना दिसल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत सामान्य नागरिकांच्या कानशिलात लगावली. उपजिल्हाधिकारी राजपूत हे जिल्हाधिकाऱ्यांच्या एक पाऊल पुढेच निघाले. तरुणाला कानशिलात लगावल्यानंतर त्यांनी त्याला उठा-बशा काढण्याची शिक्षा सुनावली. यावेळी सदर तरुण हात जोडून माफी मागत असल्याचे दिसून आले.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर तरुणाने पोलिसांना बाहेर पडण्याचे कारण सांगितले. यावेळीही तो पोलिसांशी हात जोडून संवाद साधत होता. जिल्हाधिकारी शर्मा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकारी शर्मा यांनी सदर प्रकाराबद्दल माफीही मागितली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांची हकालपट्टी करण्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले. आता मुख्यमंत्री उपजिल्हाधिकाऱ्यांचीही हकालपट्टी करणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची दादागिरी

लॉकडाउनची परिस्थिती पाहण्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा शनिवारी (ता.२२) बाहेर पडले होते. त्यावेळी हा तरुण रस्त्यावरून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चौकशी केली असता त्याने लसीकरणासाठी चाललो आहे, आजीला भेटण्यासाठी निघालो आहे, मेडिकलमधून औषधे आणायला आलो होतो, अशी उत्तरे दिली. त्यामुळे जिल्हाधिकारी शर्मांनी त्याच्याकडे प्रिस्क्रिप्शनबाबत चौकशी केली. मात्र संतप्त झालेल्या शर्मांनी तरुणाचा मोबाईल रस्त्यावर आपटला आणि त्याच्या कानशिलात लगावली.

आयएएस असोसिएशननेही सूरजपूरच्या जिल्हाधिकारी शर्मा यांनी केलेल्या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. अस्वीकार्य आणि नागरी मूलभूत तत्वांच्या विरोधातील ही कृती आहे. शासकीय नोकरदारांनी सहानुभूती बाळगली पाहिजे आणि या कठीण काळात समाजाला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे म्हटले आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT