Monsoon session Latest News Monsoon session Latest News
देश

काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन रद्द; २५ जुलै रोजी केली होती कारवाई

सरकार गंभीर विषयांवर चर्चा करीत नसल्याचा आरोप विरोधक करीत आहेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रचंड गदारोळ होत असताना लोकसभेने काँग्रेसच्या (Congress) चार सदस्यांचे निलंबन (Suspension) मागे घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. ज्या खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आले त्यांच्या नावांमध्ये मणिकम टागोर, टीएन प्रतापन, ज्योतिमणी आणि रम्या हरिदास यांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. याआधी सोमवारी लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

लोकसभेत विविध मुद्द्यांवर गदारोळ करताना फलक दाखवणे आणि अवमान केल्यामुळे २५ जुलै रोजी काँग्रेसच्या (Congress) चार सदस्यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी सभागृहाच्या कामकाजातून निलंबित (Suspension) करण्यात आले होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहांच्या कामकाजात गदारोळ सुरू आहे.

सरकार गंभीर विषयांवर चर्चा करीत नसल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. मात्र, सोमवारी काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेण्यात आल्यानंतर लोकसभेचे कामकाज पूर्वपदावर आले. काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घेत लोकसभेत दुपारी महागाईवर चर्चेला सुरुवात झाली. याआधी सोमवारी लोकसभेचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

दोन वेळा तहकूब केल्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाले तेव्हा अध्यक्षस्थानी उपसभापती भुवनेश्वर कलिता यांनी आवश्यक ती कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवली. त्यानंतर लगेचच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी महागाई आणि केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT