Swachh Survekshan 2020 Indore ranked first for fourth contiguous time
Swachh Survekshan 2020 Indore ranked first for fourth contiguous time  
देश

स्वच्छ सर्वेक्षण अहवालात इंदौरचा 'चौकार'; देशातील चकाचक शहर 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली Swachh Survekshan 2020 : देशातली विशेषतः शहरांमधील स्वच्छतेवरून कायम ओरड होत असते. पण, आपल्या देशातील काही शहर खरचं चकाचक आहेत. देशात 2020मध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यात मध्य प्रदेशातील इंदौर (Indore) शहर देशातील सर्वांत स्वच्छ शहर असल्याचं जाहीर करण्यात आलंय. पहिल्या तीन शहरांमध्ये गुजरातमधील सूरत (Surat दुसरा क्रमांक) तर महाराष्ट्रातील नवी मुंबई (Navi Mumbai तिसरा क्रमांक) या शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे इंदौर शहराने सलग चौथ्यांदा स्वच्छ शहराचा मान पटकावलाय.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

मध्य प्रदेशात सर्वांत स्वच्छ शहरं 
मध्य प्रदेशातील इंदौरबरोबरच इतर शहरांनीही स्वच्छ सर्वेक्षण अहवालात चांगली कामगिरी केलीय. राज्यातील भोपाळ, रतलाम, देवास, उज्जैन, जबलपूर, सीहोर आणि बरहानपूर या शहरांनाही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळणार आहे. इंदौरनं 2017, 2018 आणि 2019मध्ये सलग तीन वर्षे स्वच्छ शहराचा मान पटकावला होता. त्यामुळं यंदाही इंदौरच पहिल्या क्रमांकाच्या रेसमध्ये होतं. इंदौरच्या नागरिकांनाही या निकालाची प्रचंड उत्सुकता होती. इंदौरमध्ये अनलॉक-1पर्यंत शहरातली रस्ते चकाचक होत होते. शहरातील प्रमुख रस्ते रात्री धुण्यात येत होते. शहरात रोजच्या रोज कचऱ्याचा उठाव केला जातो. 

पहिले म्हैसूर नंतर, इंदौर
जगातील सर्वांत मोठ्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात देशातील 4 हजार 242 शहरांचा समावेश होता. तसेच 62 कँटोन्मेंट बोर्ड आणि गंगेच्या किनाऱ्यावरील 92 वस्स्त्यांचा समावेश होता. देशात 2016पासून अशा प्रकारचे स्वच्छता सर्वेक्षण दर वर्षी करण्यात येत. पहिल्या वर्षी कर्नाटकमधील म्हैसूर शहराने हा मान पटकावला होता. परंतु, त्यानंतर सलग तीन वर्षे इंदौरनं बाजी मारली आहे आणि स्वच्छ शहरांच्या यादीतून म्हैसूर मागं पडत गेलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT