swatantryaveer savarkar photo defaced at banaras hindu university
swatantryaveer savarkar photo defaced at banaras hindu university 
देश

सावरकरांच्या तसबिरीचे विद्रुपीकरण; बनारस हिंदू विद्यापीठात तणाव

सकाळ डिजिटल टीम

वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठात (बीएचयू) वीर सावरकर यांच्या छायाचित्राचे विद्रुपीकरण करण्यात आल्याची घटना समोर आल्याने मंगळवारी तणाव निर्माण झाला होता.  या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

काय घडले कसे घडले?
बीएचयूच्या राजशास्त्र विभागात ही घटना घडली. या विभागात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह वीर सावरकर आदी अनेक मोठ्या नेत्यांचा तसबिरी लावण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या सावरकरांच्या तसबिरीवर शाई फेकून तिचे विद्रूपीकरण करण्यात आल्याची बाब मंगळवारी सकाळी निदर्शनास आली. याची माहिती विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाला कळविली.  त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून, घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीएचयूमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

बनारस हिंदू विद्यापीठ आणि वाद!
दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाप्रमाणे बनारस हिंदू विद्यापीठही कायम चर्चेत असते. विद्यापीठात यापूर्वीही अनेक वाद निर्माण झाले आहेत. मध्यंतरी फिरोज खान यांनी संस्कृत शिकवून नये, म्हणून तेथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. मुळात फिरोज खान हे राष्ट्रीय संस्कृत संस्थानात शिकलेले होते. त्यांची संस्कृत प्राध्यापक म्हणून, नियुक्ती झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशात बनारस येथे हे विद्यापीठ असून, विद्यापीठात सुमारे 35 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथे विद्यार्थ्यांसाठी 75 वसतीगृहे आहेत. विद्यापीठाला बीएचयू नावाने ओळखले जाते.

आणखी बातम्या वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT