Swati Maliwal Assult Esakal
देश

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- आपच्या राज्यसभेतील खासदार स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. स्वाती मालिवाल यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप आहे. शिवाय, त्यांना मारहाण केल्याचा देखील आरोप आहे. याप्रकरणी आता मालिवाल यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपला जबाब नोंदवल्याची माहिती आहे.

स्वाती मालिवाल यांच्याकडून माहिती घेण्यासाठी पोलिसांची एक टीम त्यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर पोलिसांच्या टीमने त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिसांची टीम चार तास मालिवाल यांच्या निवासस्थानी होती. त्यांच्यासोबत एक महिला पोलीस अधिकारी देखील होती. एएनआयने एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

स्वाती मालिवाल या सोमवारी सकाळी सिविल लाईन्स पोलीस स्टेशन येथे पोहोचल्या होत्या. त्यांनी आरोप केला होता की, अरविंद केजरीवाल यांच्या पीएने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. पण, त्यावेळी मालिवाल यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नव्हती. आता तक्रार दाखल झाली असल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

सदर घटना घडल्यानंतर मंगळवारी आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले होते की, 'ही एक निंदनीय घटना आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याप्रकरणी कठोर कारवाई करतील.' त्यांनी सांगितलं की, 'सोमवारी सकाळी मालिवाल अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. जेव्हा त्या हॉलमध्ये केजरीवालांची वाट पाहात होत्या. त्यावेळी विभव कुमार याने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT