देश

Delhi Murder: चार वर्षांआधी सोशल मीडियावर झाली होती मैत्री, स्वित्झर्लंडहून बॉयफ्रेंडला भेटायला आलेल्या महिलेची हत्या

दिल्लीच्या तिलकनगर भागातील एमसीडी स्कूलजवळ एका गाडीत महिलेचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची ओळख आता पटली आहे. ही महिला मूळची स्वित्झर्लंडची आहे.

Manoj Bhalerao

Swiss Women Killed in Delhi: दिल्लीच्या तिलकनगर भागातील एमसीडी स्कूलजवळ एका गाडीत महिलेचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची ओळख आता पटली आहे. ही महिला मूळची स्वित्झर्लंडची आहे. याबद्दल पोलिसांनी माहिती दिलीये आणि एका संशयिताला अटकही केली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी पोलिसांनी संशयिताकडून हस्तगत केली.

हत्येच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, संशयित आरोपी गुरप्रित याने या कारचा वापर करत त्याने मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकला. चौकशीच्या वेळी संशयिताने त्याने खुलासा केला की या महिलेची आणि त्याची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून चार वर्षांआधी ओळख झाली होती.

तीन वर्षांआधी झालेल्या मैत्रीचं रुपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर संशयित तिच्या प्रेमात पडला. मात्र, त्या मुलीचा आणखी एक बॉयफ्रेंड होता. त्यामुळे तिचे संशयितासोबत खटके उडू लागले.

पोलिसांनी सांगितलं की, संशयिताने या महिलेला कॉल केला आणि तिला भेटीसाठी स्वित्झर्लंडहून भारतात बोलवून घेतलं. जेव्हा ते दोघे भेटले तेव्हा तो तिला एका ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर त्या मुलीचे हात आणि पाच एका साखळीने बांधले. पोलिसांच्या मते, या संशयिताने कार विकत घेण्यासाठी दुसऱ्या मुलीच्या ओळखपत्राता वापर केला होता.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की त्यांना सकाळी ८. ४५ ते ९ वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की तिलकनगर भागात एक मृतदेह मिळाला आहे. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं.

प्राथमिक तपासात असं दिसलं की ही हत्या आहे. त्यानंतर कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत प्रकरणाचा तपास सुरु केला. आसपासच्या ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्यांमध्ये एक संशयास्पद कार फिरताना दिसली. त्यानंतर पोलिसांनी ही कार शोधली. ही कार जनकपुरी भागातून खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुरप्रितच्या मुसक्या आवळल्या. सुरुवातीला तो पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करत नव्हता. पोलिसांनी त्याच्याकडून १.५ कोटी रुपये ही जप्त केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

Nilesh Ghaywal Crime : नीलेश घायवळ टोळीवर आणखी एक ‘मकोका’; कोथरूडमधील हल्ला प्रकरणात १७ जणांवर कारवाई

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

SCROLL FOR NEXT