Sylvester daCunha esakal
देश

Amul Girl : अशी झाली होती 'अमूल गर्ल' ची निर्मिती..., कोण होते Sylvester daCunha?

डेअरी प्रोडक्ट तयार करणारी प्रसिद्ध कंपनी अमूलची 'अटरली बटरली' गर्ल कॅम्पेन तयार करून ब्रँडची ओळख निर्माण करणाऱ्या सिल्वेस्टर यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

साक्षी राऊत

Sylvester daCunha : 'अमूल गर्ल'चे अॅड गुरू सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे मंगळवारी निधन झाले. डेअरी प्रोडक्ट तयार करणारी प्रसिद्ध कंपनी अमूलची 'अटरली बटरली' गर्ल कॅम्पेन तयार करून ब्रँडची ओळख निर्माण करणाऱ्या सिल्वेस्टर यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे एमडी जयेन मेहता यांनी ट्विट करून सिल्वेस्टर डाकुन्हा यांच्या मृत्यूची माहिती शेअर केली.

1966 मध्ये अमूल गर्लची सॉलिय आयडिया देणारे सिल्वेस्टर

1966 मध्ये सिल्वेस्टर डाकुन्हा यांनी अमूल गर्ल जाहिरातीची कल्पना मांडली. यानंतर पांढऱ्या आणि लाल ठिपक्याच्या फ्रॉकमध्ये दिसणार्‍या Utterly-Butterly मुलीने अशी जादू केली की अमूल ब्रँडला देशात आणि जगात एक नवीन ओळख मिळाली. एवढेच नाही तर अमूल गर्ल ही जगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या जाहिरातींपैकी एक आहे. (Death)

अमूल गर्लची खास वन लायनर

अमूल गर्ल मोहीम इतकी यशस्वी होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यासोबत दिलेला वन लाइनर, 'अटरली बटरली अमूल' जे अमूल गर्लप्रमाणे आधुनिकतेचे प्रतिबिंब होते. प्रत्येक अॅडसोबत एक जबरदस्त वन लायनर आणि सहज मन जिंकून घेणाऱ्या अमूल गर्लने हे अॅड कँपेन खास बनवले आहे. हे अॅड कँपेन एवढे यशस्वी झाले की अमूल ब्रँडला नवी ओळख मिळाली. (Amul Company)

सिल्वेस्टर यांच्यामागे कुटुंबात त्यांची पत्नी निशा आणि मुले राहुल डाकुन्हा आहेत. अमूल गर्ल मोहीम सुरू झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी सिल्वेस्टरने आपल्या भावासोबत १९६९ मध्ये डाकुन्हा कम्युनिकेशन्सची स्थापना केली. या मोहिमेला 2016 मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली. आता ही एजन्सी त्यांचा मुलगा राहुल चालवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT