Tamil Nadu college student gang-raped 
देश

Crime News : धक्कादायक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्या मित्रासमोरच सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

गुरुवारी चेन्नई जवळील कांचीपुरम-पुडुचेरी रस्त्यावरील एका निर्जन ठिकाणी पाच तरुणांनी एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला. यावेळी पीडित मुलीचा मित्र देखील उपस्थित होता. त्याच्यासमोरच तरुणांनी विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 

पीडित मुलगी आणि तिचा मित्र गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास एका खाजगी शाळेजवळ बोलत असताना पाच जणांच्या टोळीने त्यांना घेरले आणि पीडितेच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांनी पीडितेवर बलात्कार केला. 

आरोपींनी पीडित मुलीच्या मित्राला पीडित मुलीची हत्या करुन तिला पुरण्याची धमकी देखील दिली. या प्रकारानंतर पीडित मुलगी आणि तिचा मित्र संधी मिळताच तेथून पळून गेले आणि त्यांनी नातेवाईकांकडे संपर्क साधला. पीडितेला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी कांचीपुरम तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित मुलीच्या मित्राची चौकशी केली असता प्राथमिक तपासात गुन्हेगारांनी तोंडाला मास्क लावल्याचे समोर आले. मात्र टोळीतील विमलचे नाव समोर आले. माहितीच्या आधारे विशेष पथकाने घटनास्थळाजवळील गावांमध्ये तपास सुरू केला आणि त्यांनी विपेडू गावात गेले असता विमल कुमार नावाच्या तरुणाने पोलिसांना पाहून पळाला.

यावेळी पोलिसांनी त्याला घेराव घालत ताब्यात घेतले. विमल कुमार (२५) याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कांचीपुरम जिल्ह्यातील सेरालिमेडू कॉलनीतील मणिकंदन (२२), शिवकुमार (२०), विघ्नेश (२२) आणि विप्पडू येथील थेनारासू (२३ यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या नराधमांची अज्ञातस्थळी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणी आणि पुढील समुपदेशनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT