Crowd chaos at Vijay Thalapathy’s Karur rally led to a tragic stampede.

 

esakal

देश

Karur stampede case Update : तामिळनाडूतील करूर चेंगराचेंगरी प्रकरणी विजय थलपतींवर गंभीर आरोप!

Tamil Nadu police Allegations Vijay Thalapathy : पक्षाच्या नेत्यांवरही एफआयआर दाखल ; जाणून घ्या, पोलिसांनी नेमका काय आरोप केला आहे?

Mayur Ratnaparkhe

Vijay Thalapathy’s role in the Karur stampede incident : तमिळनाडूतील करूर येथे २७ सप्टेंबरच्या रात्री अभिनेता-राजकारणी विजय थलपती यांच्या निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ८० जण जखमी झाले आहेत. एफआयआरमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलपती आणि त्यांच्या पक्षाच्या इतर तीन नेत्यांना या चेंगराचेंगरीसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. 

पोलिसांनी टीवीके पक्षाचे सचिव मथियाझनग, राज्य सरचिटणीस बुशी आनंद आणि राज्य संयुक्त सचिव सीटीआर निर्मल कुमार यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०५, ११०, १२५ (ब), २२३ आणि तामिळनाडू सार्वजनिक मालमत्ता कायद्याच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये म्हटले गेले आहे की, विजय थलपतीच्या रॅलीसाठी ११ अटी निश्चित करण्यात आल्या होत्या आणि सुरक्षा व प्रवास व्यवस्थेसाठी ५०० पोलिस कर्मचारी तैनात केले होते. एफआयआरमध्ये म्हटले गेले आहे की, मीडियामध्ये विजय थलपती दुपारी १२ वाजता येणार असल्याचे वृत्त झळकल्याने आयोजन ठिकाणी सकाळी दहा वाजेपासूनच प्रचंड गर्दी होवू लागली होती. मथियाझगन यांनी दहा हजार जणांच्या गर्दीसाठी परवानगी मागितली होती. परंतु छोट्याशा जागेत जवळपास २५ हजार लोक भरले गेले.

एफआयनुसार विजय थलपती सायंकाळी ४.४५ वाजता करूर जिल्ह्याच्या सीमेवर पोहचले होते. परंतु रॅलीच्या ठिकाणी येण्यास जाणूनबुजून उशीर केला आणि विनापरवानगी रोडशो केला. प्रशासनाकडून रॅलीसाठी घालून दिल्या गेलेल्या नियमांचे पालन केले गेले नाही, ज्यामुळे गर्दी आणि पोलिस यांना ट्राफिक मॅनेजमेंट करण्यात असुविधा झाली. सायंकाळी सात वाजता विजय यांची बस वेलुचामीपुरम येथे पोहचली होती, परंतु पुन्हा रॅलीत येण्यासा जाणूनबुजून उशीर केला, परिणामी अजून गर्दी जमली.

एफआयआर मध्ये म्हटले गेले आहे की, पोलिस अधिकाऱ्यांनी मथियाझगन, बुशी आनंद आणि सीटीआर निर्मल कुमार यांना इशारा दिला होता. की, गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. ज्यामुळे श्वास कोंडणे आणि शारीरिक इजा होण्याचा धोका आहे. परंतु टीवीके नेत्यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले.

एफआयआरनुसार टीवीके नेत्यांनी कार्यकर्त्यांना व्य़वस्थित हाताळले नाही. ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. लोक झाडांच्या फांद्यावर आणि रस्त्यांच्या दुतर्फा दुकानांच्या शेडवर चढले. मात्र त्यावर अधिक भार झाल्याने ते तुटले, ज्यामुळे ती लोकं खाली कोसळली आणि गर्दीत चेंगराचेंगरी सुरू झाली अनेकांचे श्वास कोंडल्याने त्यांचा जागीच मृत्यूही झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology News: जोडीदारासाठी काहीही...! 'या' तारखेला जन्मलेले लोक निष्ठावंत असतात; प्रेमात कधीच धोका देत नाहीत

Nashik News : बिबट्यासोबत कोल्ह्याची भर; टाके देवगाव-वावीहर्ष परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्याने तिघे जखमी!

Solapur Election News: महाआघाडीचे आमदार-खासदार करणार लोकसभा, विधानसभेतील मदतीची परतफेड

Malegaon News : 'नकाशा दाखवा, मगच झाडाला हात लावा'; ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधामुळे संतप्त शेतकऱ्यांनी चार तास रस्ता रोखला!

Short-Term Career Course: करिअरला द्या नवे वळण! ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग तरुणांचे आवडते शॉर्ट टर्म कोर्स

SCROLL FOR NEXT