Tamilnadu Accident e sakal
देश

Tamilnadu Accident: भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक! बाळासह एकाच कुटुंबातील ६ ठार

ट्रकच्या धडकेत बाळासह एकाच कुटुंबातील ६जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Tamilnadu Accident News : तामिळनाडूतील सलेम जिल्ह्यात संकरी भागाजवळ बुधवारी पहाटे एका मिनीव्हॅनचा भीषण अपघात झाला. यावेळी एका 1 वर्षीय चिमुकलीसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे यात जखमी झाले आहेत.

सेल्वराज (50), एम अरुमुगम (48), मंजुला (45), पलानीसामी (45), पप्पाथी (40) आणि आर संजना (1) अशी मृतांची नावे आहेत.

पलानीसामी यांची मुलगी आर प्रिया (21) हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी सालेमच्या राजादुराईशी झाला होता. मात्र आपापसात झालेल्या वादामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

पलानीसामी आणि पप्पाथी, त्यांचे नातेवाईक अरुमुगम व मंजुला आणि सेल्वराज हे मंगळवारी संध्याकाळी प्रिया आणि तिची मुलगी संजनाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी सेलमला आले होते. अरुमुगम यांचा मुलगा विक्की उर्फ विघ्नेश (25) ही मिनीव्हॅन चालवत होता.

राजादुराई यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर, हे सर्व रात्री प्रिया आणि संजनासह पेरुंडुराईला परतायला निघाले. यावेळी मिनी व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर प्रिया आणि विक्की जखमी झाले.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'अतिवृष्टी नुकसान मदतीला पंचनाम्याचा अडथळा'; एकाही जिल्ह्याचा अंतिम अहवाल नाही; शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा..

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT