file photo sakal media
देश

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग? दोन काश्मिरी हिंदूंची दहशतवाद्यांकडून हत्या

वारंवार होत असलेल्या या घटनांमुळं काश्मीर खोऱ्यातील वातावरण तणावपूर्ण आहे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगचा प्रकार घडला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. शोपियाँ इथं हा अंदाधुंद गोळीबाराचा प्रकार घडला. यापूर्वी गेल्या दिवसांत सरकारी सेवेत असलेल्या हिंदू पंडितांना दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आल्या आहेत. (Target killing again in Jammu and Kashmir two Kashmiri Hindus killed by terrorists)

वारंवार होत असलेल्या या टार्गेट किलिंगमुळं काश्मीर खोऱ्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. यापार्श्वभूमीवर काश्मीरमधील हिंदूंनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. यापूर्वी काश्मीरमधील टार्गेट किलिंगवरुन मोठ्या प्रमाणावर राजकारण झालं होतं. यावरुन अनेक राजकीय पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

काश्मिरी पोलिसांनी या घटनेबाबत सांगितलं की, "शोपियाँमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एक नागरिक मारला गेला आणि एकजण जखमी झाला. यानंतर जखमी व्यक्तीला शोपियाँमधील अॅपल ऑर्किड रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं पण उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला. ज्या दोघांवर हा हल्ला झाला ते दोघेही अल्पसंख्यांक हिंदू समाजातील होते"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar last call Shrijit Pawar : विमान अपघातापूर्वी अजित दादांनी शेवटचा कॉल केलेले श्रीजीत पवार कोण?

Mumbai Pune Express way : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक, टोल वसूल करताय पण सुविधा देणार कोण?

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

IT Stock Crash : अमेरिकन कंपनीच्या भीतीने TCS, Infosys सोबत या IT कंपन्यांचे शेअर्स कोसळले! काय आहे कारण?

Content Creator Labs : कॉलेजमध्ये शिकता-शिकता करा लाखोंची कमाई! मिळणार 'क्रिएटर' बनण्याचे सर्टिफिकेट, Netflix अन् Google स्वतः देईल जॉब

SCROLL FOR NEXT