देश

Target Killing : टार्गेट किलिंगच्या भीतीने काश्मिरी पंडितांनी सोडलं गांव

काश्मिरी पंडित समाजात भीतीच वातावरण

सकाळ डिजिटल टीम

शोपियान जिल्ह्यातील चौधरी गुंड येथे 15 ऑक्टोबर रोजी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर काश्मीरच्या राजकीय पक्षांनी आणि ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सने या घटनेचा निषेध केला होता. मात्र या घटनेनंतर काश्मिरी पंडित समाजात भीतीच वातावरण पसरल आहे. यामुळेच सर्व काश्मिरी पंडित कुटुंबे चौधरी गुंड गावातून जम्मूमध्ये स्थलांतरित झाली आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे लोक अनेकदा हिवाळ्यात जम्मूला जातात.

श्रीनगरपासून 55 किमी अंतरावर असलेल्या शोपियान जिल्ह्यातील चौधरी गुंड गावात शांतता होती. दहशतवादाच्या काळात येथे राहायला आलेली सर्व काश्मिरी पंडित कुटुंबे आज जम्मूला रवाना झाली असून त्यांच्या घरांना कुलूप लावलेली दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गावात एकूण नऊ काश्मिरी पंडित कुटुंबे राहत होती. पूरण कृष्णा भट यांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंबीय जम्मूमध्ये स्थलांतरित झाले होते. पण आता राहिलेली आठ कुटुंबेही येथून निघून गेली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काहींनी आपली शेती आणि बागकामाची कामेही अपूर्ण ठेवली आहेत.

एका काश्मिरी पंडिताने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जम्मूला पोहोचलेल्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आमच्या समुदायातील नागरिकाच्या हत्येनंतर लोक घाबरले आहेत. ते सांगतात की ते सध्या जम्मूला आले आहेत, ते जमीनदार लोक आहेत. त्यांच्याकडे शेती आणि बागायतीशिवाय कोणताही व्यवसाय नाही. शेवटी, कधी ना कधी आपल्याला परत यावेच लागेल. तूर्तास, आम्ही हिवाळ्यात जम्मूमध्ये राहू आणि नंतर परिस्थिती कशी होते ते पाहू. खोऱ्यातील वातावरण अनुकूल असल्याचे जाणवले, तर परत जाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT