tata group Cyrus Mistry died in an accident at Charoti in Palghar  
देश

Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

Cyrus Mistry Death : पालघरच्या चारोटी येथे सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान अहमदाबाद- मुंबई रस्त्यावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. या अपघातात मिस्त्रींसह आणखी एकाचा मृत्यू झाला असून आणखी दोन जण या अपघातात जखमी झाले आहेत.

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. मिस्त्री हे वयाच्या 43 व्या वर्षी 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले होते, त्यानंतर 2016 साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री हे मर्सिडीज गाडीने गुजरात उधंवाडावरून मुंबईकडे जात असताना चारोटी जवळील सूर्या नदी पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर कार रस्ता दुभाजकाला धडकली. दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला असून कारमध्ये एकूण चार प्रवासी होते. त्या पैकी सायरस पारंजी मिस्त्री व जहागीर दिनशा पंडोल यांचा जागीच मृत्यू झाला तर अनायता पंडोल व देरीयल पंडोल हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी गुजरातमधील रेनबो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी कासा पोलीस ठाणे अधिकारी व पोलीस कर्मचारी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी कासा रुग्णालय व अपघात स्थळी भेट दिली. सदर अपघात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असावा, गाडी महिला चालवत होती. पुढील कार्यवाही पोलीस करीत असून जखमी पैकी महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : जानेवारीच्या पगारात 8व्या वेतन आयोगाची वाढ मिळेल का? किती वाढणार पगार? जाणून घ्या पगारवाढीबाबत मोठा अपडेट

मराठी अभिनेत्रीला लागली लॉटरी! नुकतीच सुरू झाली नवीन मालिका; आता चित्रपटही येणार, कोण आहे ती?

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Navneet Rana : मौलानाला चार बायका १९ मुलं, आता हिंदूंनीही ४ मुलं जन्माला घाला; भाजप नेत्या नवनीत राणांचं खळबळजनक विधान

रुग्णाला घेऊन जाणारं अमेरिकन नौदलाचं विमान कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

SCROLL FOR NEXT