Tata Group may cut pay of employees at some cos 
देश

लॉकडाऊनचा टाटा ग्रुपलाही फटका; घेणार 'हा' मोठा निर्णय?

वृत्तसंस्था

मुंबई : लॉकडाऊनचा फटका हा जगातील सर्वच छोट्या मोठ्या उद्योगांना बसला आहे. यातून टाटा उद्योग समूहही सूटू शकलेला नाही. यामुळे टाटा समूह एका तिमाहीनंतर वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या पुनीत चटवाल यांनी एक इमेल पाठवला आहे. आपल्याला प्रत्येक परिस्थितीचा अभ्यास करुनच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे यात त्यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

कोणत्याही प्रकारच्या नवीन गोष्टी आणि नोकरीवर नव्याने लोकं घेण्याच्या निर्णयांवर तात्पुरती बंदी घातली जाऊ शकते, असे संकेतही चटवाल यांनी दिले आहेत. टाटा ग्रुपच्याच मालकीच्या विस्तारा एअरलाइन्सने आपल्या ३० टक्के कर्मचाऱ्यांना एप्रिल ते जून या कालावधीमध्ये काही दिवसांसाठी बिनपगारी सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. खर्चामध्ये कपात करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

देशातील हॉटेल उद्योग आणि हवाई श्रेत्रातील कंपन्यांना लॉकडाउनमुळे एक लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. विस्ताराला झालेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीला आर्थिक संकटातून वर काढण्यासाठी टाटा सन्सने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकचं नाही तर टाटा समुहाची सर्वाधिक नफ्यात राहणारी कंपनी म्हणजेच टीसीएसने आपल्या साडेचार लाख कर्मचाऱ्यांची या वर्षीची पगारवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण

दरम्यान, कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये पगारकपातीचा फटका आता टाटा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाही यावरून बसण्याची दाट शक्यता आहे. टाटा समुहातील कंपन्यांपैकी प्रमुख कंपन्या असणाऱ्या इंडियन हॉटेल्स, विस्तारा एअरलाइन्स, टाटा मोटर्स या कंपन्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. पर्यटन आणि वाहन निर्मिती श्रेत्रातील या दिग्गज कंपन्यांचे आर्थिक गणित लॉकडाउनमुळे कोलमडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT