India-China Border Dispute Kiren Rijiju
India-China Border Dispute Kiren Rijiju esakal
देश

Kiren Rijiju : भारत-चीन वाद सुरु असतानाच कायदामंत्र्यांनी शेअर केला 'तो' जुना फोटो; काँग्रेसनं केली पोलखोल

सकाळ डिजिटल टीम

मोदी सरकार झोपलं आहे तर चीन युद्धाची तयारी करत आहे, असं राहुल गांधींनी म्हटलंय.

भारत आणि चीनच्या सीमेवर (India-China Border Dispute) पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. यावेळी लडाखऐवजी अरुणाचल प्रदेशचा सीमाभाग तणावाच्या केंद्रस्थानी आहे. 9 डिसेंबरच्या सकाळी तवांग सेक्टरच्या (Tawang Sector) यांगत्सेमध्ये भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झटापट यासाठी कारणीभूत ठरलीये.

या झटापटीत काही भारतीय जवानही (Indian Soldier) जखमी झाले आहेत. यापूर्वी गलवानच्या हिंसक चकमकीत 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. आता तवांग सीमेवरील जवानांसोबतच्या फोटोवरुन वाद सुरु झालाय.

देशातील मोदी सरकार झोपलं असून चीन युद्धाची तयारी करत आहे, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केल्यानंतर केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांनी तवांग सीमेवरील जवानांबरोबरचा फोटो ट्विट केला. परंतु, रिजीजू यांनी आज तवांग सीमेवर भेट दिलीच नाही. तीन वर्षे जुना हा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे, अशी पोलखोल काँग्रेस पक्षानं केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

मोदी सरकार झोपलं आहे तर चीन युद्धाची तयारी करत आहे. मोदी सरकारकडं कोणतीही रणनीती नाही. हे सरकार इव्हेंट बेस काम करत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.

राहुल गांधी देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवत आहेत - किरेन रिजीजू

त्याचवेळी किरेन रिजीजूंनी राहुल गांधींनी केलेले आरोप फेटाळून लावलेत. ते म्हणाले, राहुल गांधी केवळ भारतीय लष्कराचाच अपमान करत नाहीत, तर देशाच्या प्रतिमेलाही हानी पोहोचवत आहेत. अरुणाचल प्रदेशातील तवांग इथं भारतीय लष्कराच्या शूर जवानांच्या पुरेशा तैनातीमुळं एलएसी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं रिजिजू यांनी ट्विट केलंय.

रिजीजूंनी कधीचा फोटो ट्विट केला?

जवानांबरोबरचा फोटो ट्विट करून रिजीजू यांनी म्हटलं की, अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील यांग्त्से क्षेत्र आता पूर्णपणे सुरक्षित आहे. इथं भारतीय जवान पूर्ण ताकदीनं तैनात आहेत. मात्र, रिजीजू आता तवांगमध्ये गेलेच नाहीत. हा फोटो 29 ऑक्टोबर 2019 च्या भेटीवेळचा आहे. जुना फोटो सध्याचा म्हणून ट्विट करणं लज्जास्पद आहे, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला मेरील स्ट्रीप यांचा सन्मान ; आईला केला पुरस्कार समर्पित

Indian Economy : भारत २०२५ पर्यंत चौथी अर्थव्यवस्था ; जी-२० शेर्पा व निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचा विश्वास

SCROLL FOR NEXT