देश

ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर दिल्ली पोलिसांची छापेमारी

विनायक होगाडे

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज ट्विटर इंडियाच्या (Twitter India) दिल्ली आणि गुरगावमधील ऑफिसवर आज सायंकाळी छापेमारी केली आहे. कथित 'COVID टूलकिट प्रकरणा'वरुन ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना सांगण्यात आलंय की, दिल्ली पोलिसांचे (Delhi Police Special cell) हे विशेष पथक नियमित प्रक्रियेचा एक भाग म्हणून ट्विटरला नोटीस देण्यासाठी ट्विटरच्या ऑफिसमध्ये गेली होती. कंपनीच्या एमडीचे प्रत्युत्तर खूप संदिग्ध असल्याने नोटीस बजावण्यास कोण योग्य आहे, हे शोधणे हे आवश्यक होतं, असं पोलिसांनी म्हटलंय. (Team of Delhi Police Special cell carrying out searches in the offices of Twitter India)

काय आहे हे प्रकरण?

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी १८ मे रोजी काँग्रेसवर आरोप करणारे एक टि्वट केले होते. या टि्वटला खुद्द टि्वटरनेच Manipulated Media अर्थात हेरा-फेरी अथवा छेडाछाड करणारे टि्वट ठरवलं होतं. संबित पात्रा यांनी त्या टि्वटमध्ये काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड हाताळीत अपयशी ठरले, हे दाखवण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठी टूलकिट बनवल्याचा आरोप केला होता. पण टि्वटरने पात्रा यांचे ते टि्वट 'मॅन्यूप्युलेटेड मीडिया' असल्याचे म्हटलं होतं. त्यावरुनच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसने टि्वटरकडे संबित पात्रा आणि अन्य भाजपा नेत्यांची टि्वट हटवण्याचा आग्रह केला होता. संबित पात्रा यांनी १८ मे रोजी #CongrssToolkitExposed या हॅशटॅगसह टि्वट पोस्ट केलं होतं. जे अनेक भाजपा नेत्यांनी शेअर केले. "मित्रांनो काँग्रेसच्या टूलकिटकडे लक्ष द्या. कोरोना साथीच्या काळात गरजवंतांना मदत केल्याचं दाखवत आहेत. पण मित्र पत्रकार आणि प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने हा पीआर अभ्यास जास्त वाटतो. काँग्रेसचा अजेंडा तुम्ही वाचा #CongressToolKitExposed" असे लिहून कागदपत्रांचे स्क्रिनशॉट शेअर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK U19: भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाजांनी टेकले गुडघे! आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

Latest Marathi News Live Update: सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर उपस्थित

Driving Test: ...तर आरटीओ अधिकाऱ्यांवर चौकशीचा फास? ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेसाठी नवीन नियम लागू; आरटीओ यंत्रणा हादरली

Pune News: मावळात पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करत संपवलं, झुडपात आढळला मृतदेह | Sakal News

Maharashtra Politics: २ महिन्यांत सत्तेचा मोठा उलटफेर? उपमुख्यमंत्री थेट मुख्यमंत्री होणार अशी भविष्यवाणी, पडद्यामागे काय सुरू आहे?

SCROLL FOR NEXT