tehsil clerk beaten by peon with shoes at uttar pradesh 
देश

Video: शिपाई अधिकाऱयाला चपलेने मारतच राहिला...

वृत्तसंस्था

हमीनपूर (उत्तर प्रदेश) : एका शिपायाने अधिकाऱयाला 12 सेकंदात 6 वेळा चपलेने मारल्याचा 19 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित घटना हमीनपुरा जिल्ह्यातील मौदहा तहसील कार्यालयात घडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

मौदहा तहसील कार्यालयामध्ये किरकोळ कारणावरून तहसील अधिकारी आणि शिपायामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने चिडलेल्या शिपायाने अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केली. शिपायाने दारू पिऊन अधिकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. शिवाय, मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद करत व्हायरल केली. मारहाण होत असताना कोणीही सोडवले नाही. पण, या प्रकरणी दोघांनीही तक्रार दाखल केलेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उपस्थितांचा आवाज ऐकायला येत आहे. 'संतराम पिट गया...' असा आवाज येत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT