Tejashwi Yadav esakal
देश

'देशात समान नागरी कायदा आणला तर संसदेत विरोध करू'

सकाळ डिजिटल टीम

समान नागरी कायद्यावरून देशात वाद वाढत चाललाय.

बिहारमध्ये (Bihar) समान नागरी कायद्यावरून (Common Civil Code) वाद वाढत चाललाय. असा कोणता कायदा आल्यास राजद संसदेत विरोध करेल, असं विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी भाजपला (BJP) सुनावलंय. ते म्हणाले, आरएसएसला देशात संविधानाच्या जागी आपला अजेंडा राबवायचाय. सध्या देशातील सरकार नागपुरातून चालवलं जात आहे. जेव्हा सरकार हा कायदा आणेल, तेव्हा राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) त्याला विरोध करेल. यासोबतच सीबीएसईच्या अभ्यासक्रमात उर्दू विषयाच्या चॅप्टरबाबत करण्यात आलेल्या बदलांनाही विरोध करणार असल्याचं तेजस्वी यांनी सांगितलंय.

तर, दुसरीकडं आरजेडी कार्यकर्ता रामराज यांच्यासोबत तेजप्रताप यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या आरोपावर तेजस्वी यादव यांनी याबाबत माहिती घेतली जाईल, असं सांगितलंय. सध्या बिहारमधील राजकारण समान नागरी कायद्यावरून जोरात सुरूय. भाजप ही काळाची गरज असल्याचं म्हणत असताना, जेडीयू संसदीय मंडळाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी देश संविधानावर चालतो आणि भविष्यातही चालत राहील, असं म्हंटलंय. बिहारमध्ये समान नागरी संहितेची गरज नसताना मग प्रश्न येतोच कुठून? बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं सरकार आहे आणि त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणत्याही किमतीत समान नागरी संहिता लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

उपेंद्र कुशवाह पुढं म्हणाले, 'भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. आपलं राहणीमान, खाणं-पिणं या गोष्टींच्या आधारे तयार झालेली आपली संस्कृती ही आपल्या भारताची संस्कृती आहे. हे आमचं सौंदर्य आहे. हे सौंदर्य बिघडवून काय उपयोग? मला वाटत नाही की, त्यात काही छेडछाड करण्याची गरज आहे.'

समान नागरी कायदा ही काळाची गरज : भाजप

भाजपनं समान नागरी संहिता ही काळाची गरज असल्याचं म्हटलं असून, समान नागरी संहितेवर सर्वांनी एकत्र यावं, असं भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय वाघ (Sanjay Wagh) म्हटलंय. राष्ट्रहिताच्या दृष्टीनं सर्व पक्षांनी यावर एकमत व्हायला हवं. अशा विषयावर राजकारण होता कामा नये, असंही ते म्हणाले. यावेळी तेजस्वी यादव यांनीही समान नागरी कायद्यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT