Tejswi Yadav 
देश

सत्तेचा मार्ग खुला झाल्यानंतर तेजस्वी यादव भाजपविरोधात आक्रमक; म्हणाले...

पंजाब आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा दाखलाही तेजस्वी यादव यांनी दिलाय

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : भाजपच्या १६ आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर अल्पमतात आलेल्या नितीश कुमार यांनीही आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण लगेचच त्यांनी महागठबंधनला नव्यानं सत्ता स्थापनेसाठी साद घातली. तेजस्वी यादव यांची भेट घेत त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. राजदसाठी अशा प्रकारे सत्तेचा मार्ग खुला झाल्यांतर तेजस्वी यादव अचानक भाजपविरोधात आक्रमक झाले असून भाजपवर सडकून टीका केली. (Tejashwi Yadav aggressive against BJP after the path to power was opened)

तेजस्वी यादव म्हणाले, प्रादेशिक पक्षांना आम्ही संपवण्याची भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली होती. भाजपला फक्त धमकावणं आणि लोकांना विकत घेणं माहितीए. आम्हाला भाजपचा अजेंडा बिहारमध्ये कदापी लागू होऊ द्यायचा नाहीए. आपल्या सर्वांना माहितीए की लालुजींनी अडवाणींचा रथ रोखला होता. आपण भाजपबाबत सौम्य धोरण कदापी घेता कामा नये. आज सर्व पक्षांनी आणि बिहार विधानसभेच्या भाजपच्या सोडून सर्व सदस्यांनी नितीशकुमार यांना आपला नेता मानलं आहे.

आमच्या पूर्वजांचा वारसा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आता हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भाजपचा एकही मित्रपक्ष राहिलेला नाही. इतिहास हेच सांगतो की, भाजपशी युती केलेल्या पक्षाला ते संपल्याशिवाय राहत नाही. हे आपण पंजाब आणि महाराष्ट्रात पाहिलंच आहे, असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आई-वडिलांना राजीव गांधींबद्दल सांगण्याची भीती; सोनिया गांधींनी काय केलं? पुस्तकात सांगितला खासगी आयुष्यातील किस्सा

Vehicle Insurance Expiry : गाडीचा इन्शुरन्स संपलाय, टोल नाका ओलांडताच दहा हजारांच्या दंडाचा येणार मेसेज; काय आहे नवीन नियम ?

Gokul Milk Rate : मुंबई-पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत दूध महागणार; 'गोकुळ'च्या दरात प्रति लिटर 2 ते 4 रुपयांची वाढ निश्चित, दरवाढीचा निर्णय शनिवारी शक्य

IND vs NZ, 1st Test: तो OUT होता... DRS मध्ये फिलिप्सला नाबाद दिल्यानं शुभमन गिलचा चढला पारा; अंपायरशीही वाद

Kolhapur KMT Ticket Hike : कोल्हापूरकरांच्या खिशाला कात्री! केएमटीचा प्रवास महागणार; तिकिटाचे दर 'इतक्या' रुपयांनी वाढणार?

SCROLL FOR NEXT