RJD leader Tejashwi Yadav addressing an election rally in Bihar, making a strong remark on the Waqf Act and Mahagathbandhan’s future policy.

 

esakal

देश

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Tejashwi Yadav comments on Waqf Act during Bihar election campaign : भारतीय जनता पक्षाला "भारत जलाओ पार्टी" असेही संबोधले ; जाणून घ्या, आणखी काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Tejashwi Yadav Big Statement on Waqf Act: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी आज (रविवार) वक्फ (दुरुस्ती) कायद्याबाबत मोठं विधान केलं. तेजस्वी यादव म्हणाले की, जर महाआघाडी सत्तेत आली तर हा कायदा कचऱ्याच्या डब्यात टाकला जाईल.

बिहार विनधासभा निवडणुकीसाठी मुस्लिमबहुल कटिहार जिल्ह्यात एका जाहीर प्रचारसभेला संबोधित तेजस्वी यादव बोलत होते. यावेळी त्यांनी आरोप केला की त्यांचे वडील आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी कधीही सांप्रदायिक शक्तींशी तडजोड केली नाही, परंतु मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नेहमीच अशा शक्तींना पाठिंबा दिला आहे.

तसेच, म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटना राज्यात आणि देशात द्वेष पसरवत आहेत. असाही आरोप केला. एवढचं नाहीतर यावेळी तेजस्वी यादव  यांनी भारतीय जनता पक्षाला "भारत जलाओ पार्टी" असेही संबोधले आणि म्हटले की जर भाजप सत्तेत आली तर सांप्रदायिक अजेंडा तीव्र होईल.

वक्फ (सुधारणा) कायदा एप्रिलमध्ये संसदेने मंजूर केला होता. सत्ताधारी पक्षाने त्याचे वर्णन मागासलेल्या मुस्लिम आणि समाजातील महिलांसाठी पारदर्शकता आणि सक्षमीकरणाचे साधन म्हणून केले आहे, तर विरोधी पक्षाचा आरोप आहे की त्याचा मुस्लिमांच्या हक्कांवर परिणाम होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

Jogendra Kawade : फलटण प्रकरणात पडद्यामागील सूत्रधारांचा पण तपास करा

SCROLL FOR NEXT