tejashwi yadav main.jpg 
देश

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांच्या अटकेबाबत मोठी अपडेट; आता सीबीआयला...

सकाळ डिजिटल टीम

नवा दिल्ली - बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव २५ मार्च रोजी सीबीआयसमोर हजर होणार आहेत. यापूर्वी सीबीआयने त्यांना तीन वेळा चौकशीला हजार राहण्यासाठी समन्स बजावले होते, पण ते चौकशीसाठी आले नव्हते. दरम्यान, तेजस्वी यादव यांना अटक केली जाणार नाही, असे सीबीआयने कोर्टात सांगितले आहे.

सीबीआयने तेजस्वी यांना ४ आणि ११ मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते, पण ते हजर झाले नाहीत. त्यानंतर मंगळवारी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र तरीही ते हजर झाले नाहीत. या प्रकरणी सीबीआयने 4 मार्च रोजी राजद सुप्रीमो आणि तेजस्वी यांचे वडील लालू यादव यांची चौकशी केली होती.

एक दिवस आधी, 11 मार्च रोजी लालूंच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची केंद्रीय एजन्सीने त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी चौकशी केली होती.

सीबीआयने लालू यादव, राबडी देवी आणि इतर १४ जणांविरोधात गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी बुधवारी दिल्ली न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला. लँड फॉर जॉब घोटाळ्यात लालू यादव यांच्यावर आरोप आहे की त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री असताना रेल्वेत नोकरीच्या बदल्यात उमेदवारांकडून जमीन घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: कचरा उचल सेवा आता सशुल्क;कचरा संकलनासाठी शुल्क जाहीर; घर, दुकाने, हॉटेल, रुग्णालये, मॉल्ससाठी स्वतंत्र दर

Usha Chavan: अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील 'टीडीआर' प्रकरणी नाराजी; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय!

Meenakari: फक्त २५० रुपयांत घराची शोभा वाढवणार बनारसची ही शेकडो वर्षे जुनी कला! पाहा काशीच्या कलाकारांनी कसा घडवला चमत्कार!

Maharashtra Hind Kesari: सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता, विजयला अश्रू अनावर..

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

SCROLL FOR NEXT