high court sakal media
देश

लिव्ह इन पार्टनरला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करु देणाऱ्या आईचा जामीन नाकारला

कार्तिक पुजारी

आपल्या अल्पवयीन मुलीवर मित्राला लैंगिक अत्याचार करु देणाऱ्या महिलेला जामीन देण्यास तेलंगना हायकोर्टाने नकार दिला आहे

नवी दिल्ली- आपल्या अल्पवयीन मुलीवर मित्राला लैंगिक अत्याचार करु देणाऱ्या महिलेला जामीन देण्यास तेलंगना हायकोर्टाने नकार दिला आहे. महिलेने लिव्ह-इन-पार्टनरला आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करु दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी हायकोर्टाने सुनावणी करत महिलेची जामीनाची मागणी फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती जी. श्री देवी यांच्या पीठाने महिलेला जामीन देण्याप्रकरणी सुनावणी केली. महिलेविरोधात आयपीसी कलम 376(2)(f),376(3),341 आणि 50 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोर्टाने याप्रकरणी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. यावेळी कोर्ट म्हणाले की, महिलेविरोधातील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही. महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी महिला आपल्या अल्पवयीन मुलीसह एका पुरुषासोबत लिव्ह-इन राहत होती. यादरम्यान महिलेने संबंधित पुरुषाला आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करु दिला. परिणामस्वरुप, वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याने मुलगी गरोदर झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला.

एका बाळाला जन्म दिल्यानंतर सुद्धा पीडित मुलीवर अनेकदा बलात्कार होत राहिला. त्यात ती पुन्हा दोनवेळा गरोदर झाली. त्यावेळी तिने गोळ्या घेऊन गर्भपात केला. डीएनए रिपोर्टमध्येही व्यक्ती पीडित मुलीच्या बाळाचा बाप असल्याचं स्पष्ट होतंय. कोर्टाने ही बाब निदर्शनास आणली. याप्रकरणी पोलिसांनी चार्जशिट दाखल केली आहे. आरोपातील गांभीर्य लक्षात घेता, ते अत्यंत गंभीर आणि भयानक आहे. त्यामुळे आम्ही याप्रकरणात याचिकाकर्त्याला जामीन देऊ शकत नाही. याप्रकरणी न्यायमूर्तींनी संबंधित कोर्टाला खटला सुरु करुन सहा महिन्यांच्या आत निकाल लावण्यास सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT