Rajasthan_Karauli 
देश

राजस्थानात पुजाऱ्याला जिवंत जाळलं; जमिनीच्या वादातून घडली धक्कादायक घटना

वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थानमधील करौली जिल्ह्यात जमीन वादातून एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. काहीजणांनी पेट्रोल टाकून पुजाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर भाजलेल्या पुजार्‍याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही लोकांनी अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पुजाऱ्याने पोलिसांनी मरण्याआधी सांगितले होते. हा वाद मंदिराच्या जमिनीबद्दलचा असून मंदिर ट्रस्टने काही जमीन उत्पन्नाचे साधन म्हणून पुजाऱ्याच्या नावावर केली होती. 

पुजारी बाबूलाल वैष्णव हे त्यांना मिळालेल्या जमिनीवर घर बांधणार होते. मात्र, मीना समाजातील काही लोकांनी त्यांना विरोध दर्शवत त्या जमिनीवर आपला हक्क सांगितला. त्यावरून वाद झाल्यावर हे प्रकरण गावातील वडीलधाऱ्या लोकांपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांनी पुजाऱ्याच्या बाजूने निकाल दिला. 

ही जमीन आपलीच आहे, हे दाखवण्यासाठी पुजाऱ्याने त्या जमिनीवर बाजरीच्या पेंड्या ठेवल्या. तरीही आरोपींनी त्याठिकाणी झोपडी बांधण्यास सुरुवात केली. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. 

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पुजाऱ्याने म्हटले आहे की, बुधवारी (ता.७) सहाजणांनी बाजरीच्या पेंड्या पेटवून देत पुजाऱ्याच्या अंगावरही पेट्रोल टाकले. या घटनेत भाजलेल्या पुजाऱ्याला जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी (ता.८) उपचारादरम्यान पुजाऱ्याचा मृत्यू झाला. 

वरिष्ठ पोलिस अधिकारी हरजीलाल यादव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,  पुजाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी कैलाश मीनाला ताब्यात घेतले आहे. पुजाऱ्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये कैलास, शंकर, नमो मीना आणि अन्य तीन जणांचा उल्लेख केला होता. 

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Diversion : अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल; शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांना बंदी

Mumbai: मुंबईतील चाळींचा पुनर्विकास होणार, रहिवाशांना दिलासा; म्हाडाचा मोठा निर्णय; कसा असेल प्लॅन?

Raigad migratory birds : रायगड जिल्ह्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू; थंडी वाढताच देशी-विदेशी पक्ष्यांची रेलचेल

Latest Marathi News Live Update : विहिरीच्या मोजणीसाठी उतरले अन् काळाने घात केला; मातीचा ढिगारा कोसळून चार मजुरांचा दुर्दैवी मृत्यू, आंबे गावावर शोककळा

Dairy Farmers: पशुखाद्याचे भाव वाढल्याने ; दुग्ध व्यवसाय अडचणीत

SCROLL FOR NEXT