देश

बारावीच्या मूल्यमापनाची पद्धत ठरविण्यासाठी CBSCला 10 दिवसाची मुदत

'सीबीएसई'ने नेमली उच्च स्तरीय समिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. परंतु बारावीचा निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा तयार करण्यात येणार असून त्याआधारे निकाल जाहीर होणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सीबीएसईने १२ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती नेमली असून येत्या दहा दिवसांत समितीला आराखडा तयार करून तो सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करून केंद्र सरकारने ‘सीबीएसई’च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. आता अंतर्गत मूल्यमापनाच्या निकषाच्या आधारे निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. हा निकाल देण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन आराखडा दिला जाणार असून ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी निकालाच्या निकषांचा आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापन केल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. लवकरच याबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी समितीची बैठक होणार आहे.

केंद्रीय शिक्षण विभागाचे सहसचिव विपिन कुमार, नवी दिल्लीतील शिक्षण संचालक उदित प्रकाश राय, केंद्रीय विद्यालय संघटन आयुक्त निधी पांडे, नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त विनायक गर्ग, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांचे प्रतिनिधी यांसह बारा तज्ञांचा समावेश असणारी समिती आराखडा निश्चितीसाठी काम करणार आहे.

या समितीचा आराखडा इतर राज्यातील बोर्डाच्या बारावीच्या निकालासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे सीबीएसई बारावीच्या निकालासाठी ठरविण्यात येणाऱ्या  मूल्यमापन आराखड्याकडे शिक्षण विभाग, विद्यार्थी, पालक यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

WI vs ZIM, T20 WC: वेस्ट इंडिजचा विजय अन् टीम इंडिया स्पर्धेबाहेर? झिम्बाब्वेविरुद्धच्या निकालाने सर्व गणित बिघडले, आता फक्त आणि फक्त...

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT