murder case sakal
देश

सिगारेटने जाळला चेहरा, अवघ्या १० वर्षांच्या मुलाबरोबर क्रूर वर्तन

अवघ्या १० वर्षांच्या मुलाचा क्रूरतेने घेतला जीव

सकाळ डिजिटल टीम

कानपूर : विवस्त्र, सिगारेटने जाळल्याच्या खूणा, खिळ्याने डोळे बाहेर काढले आणि गळ्या भोवती बुटाचे खूणा... कानपुरात १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ माजली आहे. मुलाबरोबर घडलेल्या क्रूरता पाहून परिसरातील लोकांबरोबरच पोलिसांनाही धक्का बसला आहे. ते मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी पोहोचले होते. मुलगा दोन दिवसांपूर्वीच बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी (ता.आठ) आढळला. त्याला मारणाऱ्यांनी त्याचे डोळे फोडले होते. डोळ्यांजवळ एक खिळा सापडला आहे. डोळे खिळ्याने काढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुलाच्या गळ्याभोवती बुटाच्या खुणा आहेत. याने मारल्यानंतर मुलाच्या गळा बुटाने दाबल्याची शंका व्यक्त केली जात आहे. (Ten Year Old Boy Brutally Killed In Kanpur Of Uttar Pradesh)

मृतदेहाजवळ आढळली दारुची बाटली, चेहऱ्यावर सिगारेटच्या खूणा

मुलाच्या मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारुची बाटलीही सापडली आहे. खून करणारे दोघे असतील असा अंदाज त्यावरुन व्यक्त केला जात आहे. दारु पिल्यानंतर क्रूरतेने मुलाची हत्या केली गेली. मुलाच्या चेहऱ्यावर सिगारेटचे चटके दिल्याच्या खूणा दिसतायत. खूनानंतर त्याला ओढत नेल्याचेही खूणा आहेत. मुलाच्या शरीराचा पाठीचा भाग काळा पडला आहे. (Crime Against Children)

मुलाबरोबर घडलेल्या क्रूरतेने पोलिस अधीक्षकांना धक्का

कानपूर (Kanpur) ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अजित कुमार सिन्हा स्वतः म्हणतात, की मुलाबरोबर घडलेली क्रूरता पाहिल्यावर त्याला खूनी किती तिरस्कार करत होते हे दिसते. हा द्वेष का होता हे त्यांना पकडल्यानंतरच कळेल. माझे हृदयही मुलाबरोबर घडलेल्या क्रूरतेने थरथरले आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कळेल की मुलाबरोबर नेमके काय घडले आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT