Harayana Accident 
देश

हरयाणात भीषण दुर्घटना! शाळेचं छत कोसळल्यानं २७ विद्यार्थी जखमी

विद्यार्थ्यांसह काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्यानं गंभीर जखमी

Amit Ujagare (अमित उजागरे)

गनौर : हरयाणाच्या गनौर गावात एका प्राथमिक शाळेचं छत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये तिसरीच्या वर्गातील २७ विद्यार्थी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने जखमी झाले आहेत. त्याचबरोबर छतावर माती भरण्याचं काम करणारे तीन मजूरही ढिगाऱ्याखाली अडकल्याने जखमी झाले आहेत. यानंतर तात्काळ अडकलेल्या विद्यार्थ्यांसह मजूरांना बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सात मुलांना रोहतक येथील पीजीआय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

गणौर गावाजवळील जीवानंद पब्लिक स्कूल या शाळेत गुरुवारी तिसरीच्या वर्गाची कच्च बांधकाम असलेल्या छतावर माती टाकण्यात येत होती. याचवेळी अचानक छत खाली कोसळलं. यामुळे या खोलीत अभ्यास करत असलेल्या २७ विद्यार्थी आणि छतावर काम करणारे ती मजूर जखमी झाले. या घटनेनंतर शाळेत एकच गोंधळ उडाला.

या गोंधळातच जखमी मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये सात मुलांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामधील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं. यामध्ये २० विद्यार्थी आणि ३ मजुरांना प्राथमोपचार देण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT