Fire in Varanasi Fire in Varanasi
देश

आगीत पिता-पुत्रांसह ४ जणांचा मृत्यू; दरवाजा उघडण्याची संधीही मिळाली नाही

सकाळ डिजिटल टीम

वाराणसीमध्ये गुरुवारी साडीच्या दुकानाला लागलेल्या आगीत (fire to sari factory) चार जण ठार झाले. मृतांमध्ये पिता आणि मुलाचा समावेश आहे. दोघेही बिहारमधील अररिया येथील रहिवासी होते. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. (Fire in Varanasi)

भेलुपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामछा येथील अशफाकनगरमध्ये दाट लोकवस्तीच्या मधोमध असलेल्या घराच्या खोलीत शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडली. बंद खोलीत चौघांचाही भाजून मृत्यू झाला. वडील आरिफ अहमद आणि मुलगा मोहम्मद शबान हे साड्यांच्या पॅकेजिंगचे काम करायचे. येथे ते भाड्याने खोली घेऊन काम करायचे. गुरुवारी दुपारीही ते साडीचे पॅकिंग करीत होते.

खोलीला दोन दरवाजे होते. घटनेच्या वेळी दोन्ही दरवाजे बंद होते. एका दरवाजाजवळ शॉर्टसर्किटमुळे आग (fire to sari factory) लागली. आग साड्यांच्या बंडलापर्यंत पसरली आणि काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. दुसरा दरवाजा उघडण्याची संधीही मिळाली नाही. आरडाओरडा ऐकून लोक पोहोचले. तोपर्यंत चौघांचाही मृत्यू (Death) झाला होता.

कुटुंबीयांना चार लाखांची मदत

या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाइकांना राज्य आपत्ती निधीतून चार लाखांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

SCROLL FOR NEXT