Terrorist esakal
देश

अल-कायदाच्या टार्गेटवर 'काश्मीर'; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर

संयुक्त राष्ट्राकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राकडून एक रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये तालिबान भविष्यात भारतासाठी धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. अल-कायदा ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय झाली असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. अफगाणिस्तानातील सरकार पाडून आपली सत्ता स्थापन केल्यानंतर अल कायदा भारतातील काश्मीर भागाकडे लक्ष केंद्रित करत असल्याचं समोर आलं आहे.

(Terrorist Active In Kashmir)

दरम्यान भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. संयुक्त राष्ट्राकडून तालिबानसारख्या दहशतवादी संघटनासंबंधी अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी अल-कायदा चा भारताला धोका असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच 'क्यूआरएस' या अल कायदाच्या संघटनाने 'नवा-ए-अफगाण-जिहाद' या मासिकाचे नाव 'नवा-ए-गजवाह-ए-हिंद' असं ठेवलं होतं. त्यानंतर संघटनेला बळ मिळत असल्याचंही रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.

अफगाणिस्तानातून अंमली पदार्थाची तस्करी वाढली आहे. हेरॉईन आणि इतर अंमली पदार्थाच्या तस्करीमधून त्यांना पैसा मिळत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. मागच्या काही महिन्यात गुजरातमध्ये समुद्रामार्गे तस्करी करण्यात येत असलेले हेरॉईन मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पंजाबमध्येही ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येत आहे. तस्करी करणारे अनेक ड्रोन भारतीय जवानांनी पाडले आहेत. त्यामुळे तालिबानातील अल-कायदा ही संघटना पु्न्हा आपलं अस्तित्व निर्माण करू लागली आहे असे संकेत रिपोर्टमध्ये देण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानात सत्ता स्थापन केल्यानंतर भारतातील काश्मीरकडे अल-कायदा या संघटनेने लक्ष केंद्रित केल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भारतासाठी ही चिंताजनक बाब आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT