Terrorist arrested in Jammu Terrorist arrested in Jammu
देश

जम्मूमध्ये दहशतवाद्याला अटक; भाजपच्या आयटी सेलचा एकेकाळी होता प्रमुख

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू पोलिसांनी दहशतवादी (Terrorist) तालिब हुसैन शाह याला अटक केली आहे. अटक केलेला दहशतवादी एकेकाळी जम्मूमधील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा सोशल मीडिया प्रभारी होता. रविवारी (ता. ३) सकाळी तालिब हुसेन शाह आणि साथीदारांना रियासी परिसरात ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दहशतवाद्यांकडून पोलिसांना दोन एके ४७ रायफल, ग्रेनेड, इतर अनेक शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात गोळ्या जप्त केल्या. (Terrorist arrested in Jammu)

ऑनलाइन सदस्यत्व घेण्याचा एकच तोटा आहे की तुम्ही कोणाचीही पार्श्वभूमी न तपासता पक्षाचे सदस्यत्व देता. या दहशतवाद्याच्या (Terrorist) अटकेनंतर हा मोठा मुद्दा समोर आला आहे. मी म्हणेन की हे एक नवीन मॉडेल आहे. ज्याच्याअंतर्गत कोणीही पक्षात प्रवेश करतो आणि रेकी करतो, असे भाजपचे प्रवक्ते आरएस पठानिया म्हणाले.

अशाप्रकारे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला मारण्याचा दहशतवादी कट रचतात. मात्र, कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक (arrested) केली. ही दिलासादायक बाब आहे. सीमेवर अनेक लोक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही भाजपचे प्रवक्ते आरएस पठानिया म्हणाले.

यावर्षी ९ मे रोजी भाजपने अटक केलेला दहशतवादी शाह याला जम्मू क्षेत्राचे आयटी आणि सोशल मीडिया प्रमुख बनवले होते. ‘श्री तालिब हुसैन शाह हे दराज कोटरंका, बुधान, जि. राजौरी येथील भाजप अल्पसंख्याक आघाडी जम्मू प्रांताचे नवीन आयटी आणि सोशल मीडिया प्रभारी असतील’ असे त्यावेळी भाजप (BJP) अल्पसंख्याक आघाडी जम्मू आणि काश्मीरने जारी केलेल्या आदेशात म्हटले होते.

यानंतर दहशतवादी तालिब हुसैन शाहचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे अनेक फोटोही समोर आले होते. जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासोबत तालिब हुसैन शाह यांचेही अनेक फोटो आहेत. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि पोलिस प्रमुखांनी दहशतवाद्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT