J&K
J&K 
देश

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात महिला ठार; तरूण गंभीर जखमी

वृत्तसंस्था

पुलवामा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे आज (बुधवार) सकाळी दहशतवाद्यांनी एका घरात प्रवेश करून अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरूण गंभीर जखमी आहे.

श्रीनगरमध्ये ईदची नमाज अदा केल्यानंतर काही लोक मुख्य रस्त्यावर आले. त्यांच्या हातात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस) आणि हाफिज सईद, मसूद अजहर, जाकिर मुसाचे छायाचित्र असलेले फलक होते. त्यावेळी त्यांनी सईद, अजहर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आणि सुरक्षा जवानांवर दगडफेक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी घरात प्रवेश करून गोळीबार केला. यामध्ये नगिना बानो या जागीच ठार झाल्या, तर मोहम्मद सुल्तान हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याची स्थिती नाजूक असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तसेच हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT