देश

Jammu Kashmir : शोपियानमध्ये मोठी चकमक; एका दहशतवाद्याला कंठस्नान

या भागात आज दिवसभर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jammu kashmir : दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. ही चकमक शोपियानच्या झैनापोरा भागातील चेरमार्ग येथे झाल्याची माहिती काश्मीर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला आहे. या परिसरात जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. (One terrorist killed in an encounter at Chermarg, Zainapora area of Shopian)

या परिसरात जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात येतेय. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने याठिकाणी शोध मोहीम सुरू केली. जवानांचं पथक संशयित ठिकाणांकडे जात असताना तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला.

दरम्यान, शुक्रवारी श्रीनगरमधील नौहट्टा भागातील ख्वाजा बाजारमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. रस्त्यावर फेकण्यात आलेल्या ग्रेनेडच्या स्फोटात परिसरातल्या तीन दुकानांच्या काचा फुटल्या आणि एका रिक्षाचंही नुकसान झालं होतं. हल्ल्यानंतर लगेचच पोलीस आणि सुरक्षा दलांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी संयुक्त कारवाई सुरू केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT