Terrorist killed in encounter Terrorist killed in encounter
देश

सुरक्षा दलांनी घेतला बदला; दोन्ही दहशतवादी चकमकीत ठार

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेले दोन पाकिस्तानी लष्कर-ए-तैयबाचे दहशतवादी रविवारी (ता. १०) शहरात झालेल्या चकमकीत ठार (Terrorist killed in encounter) झाले. तसेच तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. बिशंबरनगर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला होता. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. (Terrorist killed in encounter)

सीआरपीएफ जवानांवर ४ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासून पोलिस दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पाठलाग करीत होते. रविवारी त्यांचा ठावठिकाणा शोधून काढल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली, असे काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले. दहशतवाद्यांची हत्या (Terrorist killed in encounter) हे पोलिस आणि सीआरपीएफचे मोठे यश आहे. ‘मला संदेश द्यायचा आहे की जो कोणी निष्पाप पोलिस कर्मचारी, नागरिक, पत्रकार किंवा कोणावरही हल्ला करेल, मग तो पाकिस्तानी असो वा स्थानिक दहशतवादी मारला जाईल, असेही ते म्हणाले.

दहशतवाद्यांनी (Terrorist) हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आणि दोन दहशतवादी ठार झाले. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

चकमकीत ठार झालेले दहशतवादी ४ एप्रिलला श्रीनगरच्या मैसुमा भागात झालेल्या हल्ल्यात सामील होते. या हल्ल्यात सीआरपीएफ एक जवान शहीद झाला होता आणि दुसरा जखमी झाला होता. चकमकीत जखमी झालेल्या सुरक्षा जवानांना लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, असे विजय कुमार यांनी ट्विट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT