Parliament Sakal
देश

राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन; गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संसदेच हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मात्र, या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आधीपासूनच होते. मात्र, आता राज्यसभेच्या बारा खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. राज्यसभेत गोंधळ केल्याच्या कारणावरून ही कडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सीपीएम आणि सीपीआयचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे खासदार आहेत.

या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या खासदारांचा समावेश आहे. प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, अखिलेश प्रताप सिंग यांचा समावेश आहे. सभागृहाचे कामकाज उद्या, ३० नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. या खासदारांचं हे निलंबन चालू सत्राच्या उर्वरित भागासाठी करण्यात आलं आहे.

कोण आहेत हे बारा खासदार?

  • सीपीएम - एलामाराम करीम

  • काँग्रेस- फुलो देवी नेताम, छाया वर्मा, आर बोरा, राजमणी पटेल, सय्यद नासीर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग

  • सीपीआय - बिनॉय विस्वम

  • तृणमूल काँग्रेस - डोला सेन आणि शांता छेत्री

  • शिवसेना - प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes Series: आजपासून ॲशेसचा थरार: पर्थमध्ये रंगणार पहिली कसोटी; इंग्लंडचा संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवणार? कधी अन् कुठं बघायचा सामना?

मोठी बातमी! गुटखा, मावा विकाल तर १० वर्षांपर्यंत शिक्षा; बंदीनंतरही सोलापूर जिल्ह्यात सापडला ८२ लाखांचा गुटखा: विक्रेत्यांवर आता ‘मकोका’चीही होणार कारवाई

Panchang 21 November 2025: आजच्या दिवशी बडीशोप किंवा शतावरी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

10th CBSE Board Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! गुणवाटपाबाबत CBSEची मोठी घोषणा; जाणून घ्या नवा नियम

आजचे राशिभविष्य - 21 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT