Delhi High Court सकाळ डिजिटल टीम
देश

Delhi Riots: हसत हसत केलेलं वक्तव्य गुन्हेगारी स्वरूपाचं नसतं : HC

या प्रकरणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सकाळ डिजिटल टीम

विधानसभा निवडणूक प्रचारात नेते अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि खासदार प्रवेश सिंह वर्मा (Pravesh Singh Warma) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. दिल्लीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून या दोघांचीही नावं तात्काळ हटवण्यात यावीत, असे आदेश निवडणूक आयोगानं भाजपला दिले होते. तर संबंधित प्रकरणात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की तुम्ही हसतमुखाने काही बोलत असाल, तर त्यात काही अपराध नाही पण तुम्ही काही आक्षेपार्ह बोलत असाल तर नक्कीच हा अपराध आहे” (The bench was hearing a plea for hate speech on the Delhi riots case)

प्रक्षोभक भाषण प्रकरणी बोलताना न्यायालयाने यात काही जातीय हेतू आहेत का? असा प्रश्न विचारलाय. त्यांनी भाषणात वापरलेल्या “हे लोक" या शब्दाच्या वापरावर खंडपीठाने म्हटले की हे लोक कोणीही असू शकतात. त्यामुळे हे न्यायालयीन प्रकरण म्हणता येणार नाही.

न्यायमूर्ती चंद्रधारी सिंग यांच्या अध्यक्षतेखालील एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने पुढे सांगितले की राजकीय भाषणांवर एफआयआर दाखल करण्यापूर्वी त्याची योग्य पडताळणी करणे आवश्यक आहे.

ठाकूर आणि प्रवेश वर्मा काय म्हणाले?

काश्मीरमध्ये जे काश्मिरी पंडितांसोबत झाले होते. तेच दिल्लीमध्ये देखील होऊ शकते. शाहीन बागेतील आंदोलक घरात घुसून महिलांवर बलात्कार करू शकतात, असं विधान भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केलं होतं. तर, सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रचार सभेत 'गद्दारांना गोळ्या झाडा' असं म्हटलं होतं.



शाहीन बागची तुलना पाकिस्तानशी केल्यानंतर, भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी केली. नक्षलवादी आणि दहशतवादी ज्या प्रमाणं सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात, ते काम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुद्धा करत आहेत, असं विधान वर्मा यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'कॉकरोच जनता पार्टी'ची पाकिस्तानात क्रेझ! पाकमध्येही 'कॉकरोच पार्टी', देशाच्या गृहमंत्र्यानेच सरकारला दिला 'हा' इशारा

Deglur Accident: देगलूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत तरुण ठार, दुसरा गंभीर जखमी

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

SCROLL FOR NEXT