e-commerce
e-commerce  sakal
देश

ई-कॉमर्स साईटवरील फेक रिव्ह्युजला बसणार आळा; केंद्र सरकारनं आखली योजना

सकाळ डिजिटल टीम

ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्युजवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक फ्रेमवर्क विकसित करणार आहे. या संदर्भात ग्राहक व्यवहार मंत्रालयाने शनिवारी माहिती दिली.

ग्राहक व्यवहार विभाग (DoCA) भारतातील ई-कॉमर्स संस्थांद्वारे अवलंबत असलेल्या सध्याच्या यंत्रणेवर जागतिक स्तरावर सुरु असलेल्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करणार आहे आणि त्यानंतरच ही फ्रेमवर्क विकसित केली जाणार.

वाणिज्य संस्था, ग्राहक मंच, कायदा विद्यापीठे, वकील, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI), कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), यांसारख्या विविध पार्टनरसह Advertising Standards Council of India (ASCI) च्या सहकार्याने ग्राहक व्यवहार विभाग (DoCA) एका बैठकीत ई कॉमर्स वेबसाइट्सवरील खोट्या रिव्ह्युजवर चर्चा केली.

ई-कॉमर्स साईटवर कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना ग्राहक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेले रिव्हयुज बघतात मात्र अनेकदा हे रिव्ह्युज खोटे असल्याचे दिसून आले.

या प्रकरणाकडे बारकाईने निरीक्षण केले जावे आणि ग्राहकांच्या हितासाठी या समस्येचे निराकरण करावे, यासाठी एक फ्रेमवर्क केली जाणार. अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने बनावट आणि दिशाभूल करणार्‍या रिव्हयुजवर आणि ग्राहकांच्या हिताला हायलाइट करत हा निर्णय घेतलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT