DELHI CM ARVIND KEJARIWAL 
देश

लशीसाठी हतबल झालेल्या दिल्ली सरकारनं काढलं जागतिक टेंडर

विनायक होगाडे

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याची सातत्याने तक्रार करतानाच अनेक विदेशी कंपन्या थेट राज्यांना लसीची विक्री करण्यास तयार नाहीत, अशी हतबलता व्यक्त करणाऱ्या दिल्ली सरकारने आता आंतरराष्ट्रीय बाजारातून तब्बल १ कोटी लसमात्रा खरेदी करण्यासाठी जागतिक टेंडर काढले आहे.

दिल्लीतील सर्व नागरिकांना पुढच्या तीन महिन्यांमध्ये लसीकरण करायचे तर दरमहा ८० लाख डोस दिल्लीला मिळाले पाहिजेत, अशी राज्य सरकारची मागणी आहे. मात्र केंद्राकडून होणारा पुरवठा त्या तुलनेत अत्यंत अल्प आहे. अखेर दिल्ली सरकारने १ कोटी लसीची खरेदी स्वतः करण्याचा निर्णय घेऊन हे ग्लोबल टेंडर जारी केले आहे. मात्र यापूर्वी तरी कंपनीने दिल्लीला थेट डोस विकण्यासाठी नकार दिल्याचे प्रकरण ताजे असल्याने जागतिक बाजारपेठेतील चीन वगळता कोणत्या देशाची कंपनी दिल्ली सरकारला थेट लसी विकणार हा मुद्दा निर्माण झाला आहे.

यासाठी लिलाव अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ जून ही आहे. जे उत्पादक यात अर्ज करतील त्यांना भारतीय आरोग्य नियामक यंत्रणा, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अधिकृत मान्यता मिळणे आवश्यक असल्याचेही दिल्ली सरकारने स्पष्ट केले आहे. ऑर्डर दिल्यानंतर पहिल्या ७ दिवसांमध्ये तसेच त्यानंतर आठव्या, सोळाव्या २४ व्या ३१ व्या आणि ४५ व्या दिवशी किती लसी पुरवणार याचा स्पष्ट उल्लेख आपल्या अर्जात करावा लागेल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागच्या महिन्यात दिल्लीतही हाहा:कार उडवला होता.२८ एप्रिलला दिल्लीत सर्वाधिक २८ हजार रूग्ण आढळले होते. एका दिवसात ४०० हून जास्त लोकांचा मृत्यू होत होता. त्यानंतर दिल्ली सरकारने ऑक्सिजन कमतरतेवर उपाययोजना केल्या. मात्र केंद्र सरकारने दिल्लीला तेव्हा ऑक्सिजन देताना हात आखडता घेतल्याची तक्रार केजरीवाल यांनी केली. मागच्या आठवड्यात केजरीवाल यांनी चीनमधून सुमारे ६००० ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT