देश

समान नागरी कायद्याची देशाला गरज; हायकोर्टाने दिले केंद्राला निर्देश

विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारतात समान नागरी कायदा लागू केला जाण्याची मागणी अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. यावरुन मोठं राजकारण देखील आजवर करण्यात आलंय. मात्र, त्या दिशेने काही निर्णायक प्रयत्न होताना आजवर दिसले नाहीत. मात्र, एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान थेट दिल्ली हायकोर्टाने देशात समान नागरी कायद्याला समर्थन देऊ केलं आहे. हा कायदा देशात लागू केला जाण्याची गरज बोलून दाखवली आहे. तसेच, न्यायालयानं , या संदर्भात केंद्र सरकारला आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश देखील दिलेत.

दिल्ली हायकोर्टामध्ये तीन तलाकच्या मुद्यावर सुनावणी सुरु असतानाच कलम 44 चा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी न्यायालयाने एकाप्रकारे समान नागरी कायद्याला समर्थन देऊ केलं आहे. न्यायालयाने म्हटलंय की, आज भारतातील समाज जवळजवळ एकसारखा झाला आहे. परंपरा तुटत आहेत. त्यामुळे समान नागरी कायद्याच्या दिशेने विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये त्या-त्या धर्माचे किंवा समुदायासाठी केलेले कायदे न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणार नाहीत आणि सर्व भारतीयांना एका समान कायद्याच्या आधारे न्याय देता येईल, असं देखील मत न्यायालयाने यावेळी नमूद केलंय.

भारतात काही बाबातीत वेगवेगळ्या धर्मीयांसाठी वेगवेगळे कायदे लागू आहेत. जसे की, हिंदूंसाठी हिंदू विवाह कायदा, हिंदू वारसाहक्क कायदा, ख्रिश्चनांसाठी भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा असे वेगवेगळ्या स्वरुपाचे अनेक कायदे अस्तित्वात आहेत. याशिवाय, मुस्लीम समाजामधल्या लोकांसाठी देखील काही बाबतीत वेगळे कायदे अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायनिवाडा करताना एकूण प्रक्रिया किचकट होते. वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्ती जेव्हा विवाह किंवा घटस्फोटासारख्या प्रकरणांमध्ये असतात, तेव्हा त्यांना कोणत्या कायद्याप्रमाणे न्याय द्यावा, याप्रकारचे बरेच प्रश्न उपस्थित होतात. शिवाय, धर्माचा विषय असल्याने बरेचदा याबाबत राजकारण देखील होताना दिसून येतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT