Amit Shah, Narendra modi and mallikarjun kharge 
देश

No Confidence Motion : तुमच्या कथनी अन् करणीत फरक; अमित शहांच्या पत्राला खर्गेंचं प्रत्युत्तर

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - मणिपूरमधील महिला हिंसाचाराचा मुद्दा देशाच्या संसदेत उपस्थित करण्यात येतोय. शिवाय विरोधकांनी अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला असून त्याला लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिली आहे. त्यातच आता काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शहा यांच्या पत्राला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकार चर्चेला तयार आहे, असं पत्र मंगळवारी अमित शहा यांनी दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षांना लिहिलं होतं. तसेच सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं.

खर्गे म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून मणिपूर जळत आहे. त्यावर पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन करावे ही आमची मागणी आहे. अमित शहा यांनी पत्राच्या माध्यमातून भावना व्यक्त करणं सोपं, पण आपल्या वागण्यातून सदनामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचे विश्वास जिंकणं महत्त्वाचं आहे.

खर्गे पुढं म्हणाले की, पंतप्रधान विरोधी पक्षातील नेत्यांना इंग्रजी शासकाची उपमा देतात. दुसरीकडे गृहमंत्री त्याच दिवशी पत्र लिहितात आणि विरोधकांकडून सकारात्मकतेची अपेक्षा करतात. एकंदरीतच गृहमंत्र्यांच्या कथनी आणि करणीमध्ये किती फरक हे विरोधकांसह पूर्ण देशाला समजलं, अशा शब्दात मल्लिकार्जुन खर्गे यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT