The husband of a woman who went on a honeymoon impotent
The husband of a woman who went on a honeymoon impotent The husband of a woman who went on a honeymoon impotent
देश

हनिमूनवेळी पतीबद्दल समजली धक्कादायक गोष्ट; पत्नी पोहोचली पोलिस ठाण्यात

सकाळ डिजिटल टीम

हनिमूनला गेलेल्या महिलेला पतीची अशी गोष्ट समजली ज्यामुळे तिला धक्काच बसला. महिलेचा आरोप आहे की पतीला अनेक गंभीर आजार आहेत. जे लग्नापूर्वी सांगितले नव्हते. इतकच नाही तर पती नपुंसक (husband impotent) असल्याचे महिलेने सांगितले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहे. (The husband of a woman who went on a honeymoon impotent)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका नवविवाहित तरुणीने पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती नपुंसक (husband impotent) असल्याचा पीडितेचा आरोप आहे. तसेच त्याला गंभीर आजार आहेत. हे आजार लपवून लग्न केले आहे. हनिमूनला गेल्यावर पती नपुंसक असल्याचे कळले. लग्नाआधी कुटुंबीयांकडून जबरदस्तीने पाच लाख रुपये उकळल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

लग्नानंतर मुंबईत सासरच्या घरी गेली. जवळपास आठवडाभर तिथे राहिली. यानंतर पतीसोबत हनिमूनला गेली. तेव्हा संबंधित माहिती समजली. तिने हे सर्व सासरच्यांना सांगितले. यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. तसेच घरातून हाकलून दिले. यानंतर तिने पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.

नेहरूनगर भागात राहणाऱ्या नवविवाहितेचे फेब्रुवारी लग्न झाले होते. माहेरच्यांनी सासरच्या मंडळींना हुंडा म्हणून पैसे आणि सोने दिले. मात्र, नवविवाहितेने मुंबईत राहणारा पती, सासू, मेहुणी आणि सासरे यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT